महाराष्ट्र बॅंकेची सव्वा कोटीत फसवणूक; तत्कालीन मॅनेजरसह तीन जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 08:12 PM2022-11-26T20:12:57+5:302022-11-26T20:13:06+5:30

वाहन कर्जाच्या नावाखाली महाराष्ट्र बॅंकेची १ कोटी ३० लाखांत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bank of Maharashtra defrauded in half a crore; Crime against three people including the then manager | महाराष्ट्र बॅंकेची सव्वा कोटीत फसवणूक; तत्कालीन मॅनेजरसह तीन जणांवर गुन्हा

महाराष्ट्र बॅंकेची सव्वा कोटीत फसवणूक; तत्कालीन मॅनेजरसह तीन जणांवर गुन्हा

googlenewsNext

चाळीसगाव, जि. जळगाव : वाहन कर्जाच्या नावाखाली महाराष्ट्र बॅंकेची १ कोटी ३० लाखांत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जदार सुशील भालचंद्र पाटील (रा.पंचवटी, नाशिक), बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक अजय सिंग व प्रोसेसिंग अधिकारी मंदार चंद्रशेखर देशमुख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.  

याबाबत निशांत माणिकराव इलमकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  १ ऑक्टोबर २०२१ आणि १ जानेवारी २०२२ रोजी पाटील याने वाहन घेण्यासाठी बनावट कागदपत्रे बँकेत सादर केली.   सिंग व देशमुख यांनी कागदपत्रांची शहनिशा न करताच एक कोटी तीस लाख रुपयाचे कर्ज मंजूर केले. बॅंकेच्या लेखापरीक्षणात हा प्रकार उघडकीस आला. 

 याप्रकरणी वरील तीनही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे करीत आहेत.

Web Title: Bank of Maharashtra defrauded in half a crore; Crime against three people including the then manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव