विजुक्टाचे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 05:00 AM2021-10-17T05:00:00+5:302021-10-17T05:00:46+5:30

शिक्षकांना १०, २०, ३० त्रिस्तरीय वेतनश्रेणी देण्यात यावी.  डीसीपीएसमधून एनपीएसमध्ये हस्तांतरित शिक्षकांचे अद्यावत हिशेब देण्यात यावे, उच्च माध्यमिक तुकडीतील विद्यार्थी पटसंख्याचे निकष बदलून माध्यमिकप्रमाणे करण्यात यावेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश रद्द करून अनुदानित किंवा टप्पा अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयास वळते करावे. नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व विनाअनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.  त्रुटीपूर्ण, तसेच अघोषित उच्च माध्यमिक विद्यालयांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान द्यावे.

Demonstration in front of Vijukta's education officer's office | विजुक्टाचे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

विजुक्टाचे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर असोसिएशन जिल्हा संघटनेतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी करण्यात आले.
गत अनेक महिन्यांपासून ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांचे वेतन महिन्याच्या शेवटी उशिरा होतात. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्येला घेऊन तसेच शिक्षकांना १०, २०, ३० त्रिस्तरीय वेतनश्रेणी देण्यात यावी.  डीसीपीएसमधून एनपीएसमध्ये हस्तांतरित शिक्षकांचे अद्यावत हिशेब देण्यात यावे, उच्च माध्यमिक तुकडीतील विद्यार्थी पटसंख्याचे निकष बदलून माध्यमिकप्रमाणे करण्यात यावेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश रद्द करून अनुदानित किंवा टप्पा अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयास वळते करावे. नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व विनाअनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.  त्रुटीपूर्ण, तसेच अघोषित उच्च माध्यमिक विद्यालयांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान द्यावे. उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण द्यावे, तसेच शिक्षण शुल्क रक्कम देण्याची देण्याची व्यवस्था करावी. घड्याळी तासिका व शिक्षण सेवकांचे मानधन वाढविण्यात यावे. नवीन शिक्षकांच्या नियुक्त्या त्वरित करण्यात याव्यात. माहिती व तंत्रज्ञान विषयाला अनुदान देण्यात यावे. पीएचडी, एम.फिल अशी अहर्ता प्राप्त केलेल्या उच्च माध्यमिक शिक्षकांना एक अधिकची वेतनवाढ देण्यात यावी. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ यावर १० वी व १२ वी वर्गांना शिकविणाऱ्या, तसेच कार्यरत शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. नवीन स्वयंअर्थसहाय्याने तुकड्या बृहत आराखड्याप्रमाणे देण्यात याव्यात. निवृत्तीचे वय ६० करण्यात यावे. १ तारखेला वेतन शिक्षकांना देण्यात यावे, वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांना प्रशिक्षणाची अट शिथिल करून त्यांना ती देण्यात यावी. निवड श्रेणीमध्ये असलेल्या अन्यायकारक अटी रद्द करण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हा स्तरावर विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर असोसिएशन जिल्हा संघटना भंडारा यांच्यातर्फे धरणे आंदोलन देण्यात आले. यापूर्वी तालुक्याच्या ठिकाणी संघटनांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना तहसीलदारांमार्फत पाठवण्यात आले.  आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून जिल्हास्तरावर धरणे आंदोलन झाले. या आंदोलनाचे नेतृत्व विजुक्टा जिल्हाध्यक्ष प्रा. मार्तंड गायधने, सचिव राजेंद्र दोनाडकर, विदर्भ कार्यकारिणी सदस्य प्रा.गौपाले, प्रांतीय सदस्य प्रा. सैंग कोहपरे, प्रा. सुनील सावरकर,प्रा. सहारे, प्रा. देशभ्रतार, प्रा. कारेमोरे, प्रा. जांभुळे, प्रा. डांगे, प्रा. किरणापुरे, प्रा. सिंगनजुडे, प्रा.मेंढे, प्रा सहारे, प्रा. माकडे, प्रा. संजय पाटील, प्रा. गोंधळे, प्रा. लेनगुरे, प्रा. मोहतुरे, प्रा. बांबोडे यावेळी उपस्थित होते.
शिक्षकांचा आक्रोश
गत अनेक महिन्यांपासून ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांचे वेतन महिन्याच्या शेवटी उशिरा होते. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून जिल्हास्तरावर धरणे आंदोलन झाले. या आंदोलनात शिक्षकांनी आक्रोश व्यक्त करून प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी केली.

 

Web Title: Demonstration in front of Vijukta's education officer's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.