जीव माझा गुंतला, तुमच्या यशाची कहाणीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 04:34 PM2021-10-09T16:34:55+5:302021-10-09T16:35:18+5:30

लोकमत सखी मंच आणि कलर्स मराठी प्रस्तुत स्पर्धा : ऑनलाइन कार्यक्रमात अंतरा, मल्हार सोबत रंगला संखींचा संवाद.

colors marathi jeev maza guntala lokmat sakhi got huge response | जीव माझा गुंतला, तुमच्या यशाची कहाणीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

जीव माझा गुंतला, तुमच्या यशाची कहाणीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Next
ठळक मुद्देलोकमत सखी मंच आणि कलर्स मराठी प्रस्तुत स्पर्धा : ऑनलाइन कार्यक्रमात अंतरा, मल्हार सोबत रंगला संखींचा संवाद.

अकोला : स्त्री सबलीकरण, महिला सक्षमीकरणअंतर्गत लोकमत  सखी मंच आणि कलर्स मराठी प्रस्तुत ‘जीव माझा गुंतला, तुमच्या यशाची कहाणी’ ही स्पर्धा  आयोजित केली हाेती. या साेहळ्याचा ५ आक्टोबर रोजी सर्व सखींनी घर बसल्या मोबाइलवर आनंद घेतला. 

कलर्स मराठी वाहिनीवर  ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. ही कहाणी आहे ‘अंतरा’ या महिलेची जी रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीतेने पार पाडते आहे. ही कहाणी एका ‘अंतरा’ची असली तरी समाजात अशा असंख्य अंतरा आहेत. त्यांनी केलेला आयुष्यातील संघर्ष सर्वांसमोर यावा त्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी. या उद्देशाने ‘जीव माझा गुंतला, तुमच्या यशाची कहाणी’ ही स्पर्धा घेण्यात आली हाेती.  मालिकेतील कलाकार अंतरा आणि मल्हार यांनी लाईव्ह ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांसाेबत त्यांच्या यशाची कहाणीबाबत संवाद साधला. 

सहभागी झालेल्या ८ महिला देखील त्यांच्या आयुष्यात रिक्षा चालवितात. या साेबतच त्या त्यांचा संसाद देखील अतिशय उत्तमरित्या सांभाळतात. त्यांचे काैतुक करावे तेवढे थाेडेच आहे. यासाेबतच ‘जीव माझा गुंतला’ या मालीकेचे संगीत दिग्द र्शक, ज्यांनी या मालिकेचे शिर्षक गीत कम्पाेज केले असे निलेश माेहरिर आणि सुप्रसिद्ध गायिका शमिका भिडे जिने हे गीत गायले आहे यांनी देखील सखींसाेबत संवाद साधला. साेबतच सुप्रसिद्ध गायिका धनश्री काेरगावकर हिने आपल्या सुमधुर आवाजात मंत्रमुग्ध केले. उल्लेखनीय म्हणजे या ऑनलाइन कार्यक्रमातच जळगावचे चित्रकार निरंजन शेलार यांनी संवाद साधुन लाईव्ह ऑनलाइन कार्यक्रमात मालिकेतील कलाकार अंतरा आणि मल्हार यांचे सुंदर चित्र रेखाटले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिनेत्री सिद्धी पाटणे हिने केले. या सर्व मालिकेतील कलाकार, दिग्द र्शक आणि गायिका यांनी सर्व सखींसाेबत संवाद साधुन, जीवनात कितीही खडतर कठीण प्रसंग आले तरी खचुन न जाता खंबीरपणे सामाेरे जावे आणि स्त्री शक्तीला सन्मान करत कार्यक्रमाचा समाराेप केला.

कार्यक्रम बघण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकता.
https://www.facebook.com/LokmatEventful/videos/1013011862603237/

Web Title: colors marathi jeev maza guntala lokmat sakhi got huge response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.