चक्क आमदाराच्या गाडीपुढे झोपला युवक, घरासमोर रस्ता नसल्याने घेतला पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 10:28 IST2021-03-20T10:20:11+5:302021-03-20T10:28:48+5:30
Yawatmal News Wardha शिवसेना नेते माजी वनमंत्री आमदार संजय राठोड हे नियमितपणे जनता दरबाराकरिता आपल्या मतदार संघातील दिग्रस (जि. यवतमाळ) येथे जात असतात. पण एका अपंग युवकाची संजय राठोड यांची भेट शक्य झाली नाही .

चक्क आमदाराच्या गाडीपुढे झोपला युवक, घरासमोर रस्ता नसल्याने घेतला पवित्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिवसेना नेते माजी वनमंत्री आमदार संजय राठोड हे नियमितपणे जनता दरबाराकरिता आपल्या मतदार संघातील दिग्रस (जि. यवतमाळ) येथे जात असतात. पण एका अपंग युवकाची संजय राठोड यांची भेट शक्य झाली नाही . व्यथित झालेल्या या अपंग युवकाने शुक्रवारी दुपारी दिग्रस येथे आमदार संजय राठोड यांची गाडी येत असताना चक्क रस्त्यावर झोपून त्यांचा रस्ता अडविला. यामुळे एकच गोंधळ उडाला.
अपंग भास्कर वाघमारे गाडीपुढे झोपताच तेथे बघ्यांची गर्दी झाली. त्यानंतर पोलिसांनी वाघमारे यास उठवून आमदार राठोड यांचेकडे घेऊन गेले. यावेळी भास्कर वाघमारे याने एकवेळ आपल्या वार्डात भेट देऊन नगरसेवकांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी केली. यावेळी आमदार राठोड यांनी थोड्या वेळात येतो असा शब्द दिला. मात्र नंतर ते शहरातील लोकार्पण सोहळ्यास निघून गेले.