राहुल गांधींवरील हल्ल्याचा जिल्हा युवक काँग्रेसकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:05 IST2017-08-05T23:05:32+5:302017-08-05T23:05:54+5:30
गुजरातमधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाहनावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.

राहुल गांधींवरील हल्ल्याचा जिल्हा युवक काँग्रेसकडून निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गुजरातमधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाहनावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. हे सुडाचे राजकारण असल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसने शनिवारी यवतमाळच्या बसस्थानक चौकात मोदी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी केंद्र शासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील धनेरा येथे दगडफेकीचा हा प्रकार घडला. पोलीस संरक्षण आणि झेड सुरक्षा असतानाही हा प्रकार घडला. हे सुडाचे राजकारण आहे. या घटनेचा युवक काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध नोंदविला.
पंतप्रधानांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. नंतर मोदी शासनाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. या आंदोलनचे नेतृत्व युवक काँग्रेसचे राहुल ठाकरे यांनी केले. यावेळी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली सवई, उषा दिवटे, पल्लवी रामटेके, दर्शना इंगोले, नसरिमा बानो, नगरसेवक विशाल पावडे, दिनेश गोगरकर, सलीम सागवान, विक्की राऊत, पारस अराठे, लकी जयस्वाल, कौस्तुभ शिर्के, मंगेश देवकते, प्रफुल्ल मुंडलवार, अजय किनकर, दीपक मेश्राम, नितीन गुघाने, सागर मोगरे, शब्बीर खान, सिकंदर शाह, रवी श्रीरामे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश होता.