पारवा येथे युवकावर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: January 15, 2017 00:59 IST2017-01-15T00:59:53+5:302017-01-15T00:59:53+5:30
लगतच्या पारवा येथे पानटपरीवर क्षुल्लक वादातून युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

पारवा येथे युवकावर प्राणघातक हल्ला
यवतमाळ : लगतच्या पारवा येथे पानटपरीवर क्षुल्लक वादातून युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता घडली. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चेतन किसन देवतळे (२१) रा.पारवा, असे जखमीचे नाव आहे. तो गावातील नागपूर महामार्गावरील पानटपरीवर उभा होता. तेथे आरोपी अनिल हातमोडे पोहोचला. क्षुल्लक कारणावरून या दोघांत शाब्दिक वाद झाला. त्यानंतर अनिलने चाकू काढून चेतनच्या पोटात, हातावर, मानेवर सपासप वार केले. चेतन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, तेव्हा आरोपी अनिलने घटनास्थळावरून पळ काढला.
जखमी चेतनला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (कार्यालय प्रतिनिधी)