साहस बेतले जिवावर; डोळ्यादेखत युवक पुरात गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 21:23 IST2020-09-23T21:23:07+5:302020-09-23T21:23:34+5:30
पाणी वाहत असताना पूल पार करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार अडाण नदीत वाहून गेल्याची घटना बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. घाटंजी तालुक्याच्या निंबर्डा ते तळणी मार्गावर असलेल्या पुलावर हा प्रकार घडला.

साहस बेतले जिवावर; डोळ्यादेखत युवक पुरात गेला वाहून
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाणी वाहत असताना पूल पार करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार अडाण नदीत वाहून गेल्याची घटना बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. घाटंजी तालुक्याच्या निंबर्डा ते तळणी मार्गावर असलेल्या पुलावर हा प्रकार घडला. नकुल जयसिंग जाधव (१९) रा.किन्ही असे वाहून गेलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.
गेली आठवडाभरापासून सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे नद्या भरून वाहात आहे. अडाण नदीवर निंबर्डा गावाजवळ असलेल्या पुलावरून पाणी वाहत होते. अनेक वाहने त्यातून मार्ग काढत होती. समोर कार आणि त्यामागे नकुल जात होता. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुचाकी पाण्याच्या प्रवाहासोबत पडली. दुचाकी पुलाच्या कठड्याला अडकली. मात्र नकुल वाहून गेला. बराचवेळपर्यंत प्रयत्न करूनही त्याचा शोध लागला नाही.