खळबळजनक! तकलादू गॅलरी कोसळून तरुणाचा झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 17:06 IST2020-12-19T17:06:10+5:302020-12-19T17:06:45+5:30
Gallery Collasped : घटना शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास येथील नेहरू चौकात घडली. सुनील भानारकर, असे या घटनेतील मृताचे नाव आहे.

खळबळजनक! तकलादू गॅलरी कोसळून तरुणाचा झाला मृत्यू
यवतमाळ : टीनाच्या शेडवर भारत वाढल्याने तकलादू गॅलरी कोसळून युवक ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास येथील नेहरू चौकात घडली. सुनील भानारकर, असे या घटनेतील मृताचे नाव आहे.
नेहरू चौकात असलेल्या अपार्टमेंटवजा तीन मजली इमारतीत रवी गटलेवार हे वास्तव्याला आहे. त्यांच्या घरी सुनील भानारकर हा कामासाठी होता. गटलेवार यांच्याकडील वस्तू इमारतीच्या खाली असलेल्या शेडवर पडली. हे शेड गटलेवार यांच्या गॅलरीला जोडून बांधण्यात आले आहे. ही वस्तू काढण्यासाठी सुनील शेडवर चढला. त्याचवेळी गॅलरीचे तकलादू बांधकाम कोसळून शेडही जमिनदोस्त झाले.
गॅलरीचा मलबा आणि शेडचा मार बसल्याने सुनील गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. निकृष्ट बांधकामामुळे तरुणाचा बळी गेल्याची चर्चा या घटनेनंतर याठिकाणी सुरू होती.