दुचाकीवर हरीण आदळल्याने तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:54 IST2018-04-12T21:54:16+5:302018-04-12T21:54:16+5:30

परीक्षेला जात असताना दुचाकीवर अचानक हरीण आदळल्याने झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना मुकुटबन येथे गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

The young killed the beating of a deer on the bike | दुचाकीवर हरीण आदळल्याने तरुण ठार

दुचाकीवर हरीण आदळल्याने तरुण ठार

ठळक मुद्देमुकुटबनची घटना : परीक्षेला जाताना अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
मुकुटबन : परीक्षेला जात असताना दुचाकीवर अचानक हरीण आदळल्याने झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना मुकुटबन येथे गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
विशाल भास्कर पिंपळकर (१७) रा. गणेशपूर असे मृताचे नाव आहे. विशाल ११ वीच्या परीक्षेसाठी आपल्या बहिणीसोबत दुचाकीने मुकुटबनकडे निघाला होता. मुकुटबनजवळील एका हॉटेलसमोर हरणाचा कळप आडवा आला. त्यातील एक हरीण अचानक दुचाकीवर येऊन आदळला. त्यात विशालचे दुचाकीवरील नियंत्रण गेल्याने तो खाली कोसळला. त्याला जबर मार लागला. घटनास्थळी त्याची बहीण वैष्णवी आक्रोश करीत होती. त्यावेळी एक स्कूल बस चालकाच्या एका प्रकार लक्षात आला. त्याने लगेच एका आॅटोरिक्षातून जखमी विशालला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशाल हा आदर्श विद्यालयात दहावीच्या परीक्षेत अव्वल ठरला होता. त्याच्या या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: The young killed the beating of a deer on the bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात