यवतमाळातील ‘आयकॉन्स’चा आज अमरावतीत सन्मान

By Admin | Updated: June 8, 2017 00:24 IST2017-06-08T00:24:25+5:302017-06-08T00:24:25+5:30

मेहनत, चिकाटीच्या जोरावर यशाचा हिमालय सर करत नव्या पिढीचे ‘आयकॉन’ ठरलेल्या उत्तुंग व्यक्तींचा

Yavatmal's iconic honors in Amravati today | यवतमाळातील ‘आयकॉन्स’चा आज अमरावतीत सन्मान

यवतमाळातील ‘आयकॉन्स’चा आज अमरावतीत सन्मान

लोकमतचा पुढाकार : यशोगाथा मांडणाऱ्या ‘कॉफीटेबल बुक’चे प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मेहनत, चिकाटीच्या जोरावर यशाचा हिमालय सर करत नव्या पिढीचे ‘आयकॉन’ ठरलेल्या उत्तुंग व्यक्तींचा ‘लोकमत’तर्फे सत्कार करण्यात येणार आहे. अमरावती येथे होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यात ‘आयकॉन कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
अमरावती येथील हॉटेल ग्रॅण्ड महफिलमध्ये हा सोहळा गुरूवारी ८ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. ‘लोकमत’च्या अमरावती युनिटच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्ह्याचा लौकिक वाढविणाऱ्या मान्यवरांचा सत्कार होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील असतील. तर गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यश मिळविणे सोपे नसते. पण अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील काही व्यक्तिमत्त्वांनी नेहमीची मळवाट सोडून आपल्या कर्तृत्वाचा नवा महामार्ग सिद्ध केला आहे. त्यांचे यश आणि यश मिळविण्यामागचा हेतू, मेहनत नव्या पिढीसाठीही मार्गदर्शक ठरणारा आहे. म्हणूनच त्यांच्या यशोगाथा ‘लोकमत’ जगापुढे आणत आहे.
या यशोगाथांचे ‘आयकॉन्स आॅफ अमरावती, यवतमाळ अँड वर्धा’ हे कॉफी टेबल बुक वाचकांच्या भेटीला येत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या सुबक आणि आकर्षक पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.

हे आहेत यवतमाळचे आयकॉन
यवतमाळ जिल्ह्यातील जगजितसिंग ओबेरॉय, विनोदकुमार जैन (उमरखेड), कमलकिशोर जयस्वाल, देवीदास गोपालानी, घनश्याम बागडी, संजय चिद्दरवार, साधूराम वाधवाणी, पी. बी. आडे, जगदिश वाधवाणी, डॉ. भानूप्रकाश कदम (पुसद), सुजाता आणि विलास महाजन, दीपक आसेगावकर (पुसद) यांची प्रेरक वाटचाल या पुस्तकात समाविष्ट आहे.

 

Web Title: Yavatmal's iconic honors in Amravati today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.