यवतमाळ, पुसदमध्ये तरुणांचा खून

By Admin | Updated: May 14, 2016 02:19 IST2016-05-14T02:19:04+5:302016-05-14T02:19:04+5:30

जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या असून यवतमाळ शहरातील तलाव फैलात ....

Yavatmal, youth murders in Pusad | यवतमाळ, पुसदमध्ये तरुणांचा खून

यवतमाळ, पुसदमध्ये तरुणांचा खून

दगड, फावड्याचा वापर : एकाचा वैमनस्यातून तर दुसऱ्याचा जागेच्या वादात
यवतमाळ/पुसद : जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या असून यवतमाळ शहरातील तलाव फैलात जुन्या वादातून तरुणाचा फावड्याने तर पुसद तालुक्यातील कुंभारी येथे जागेच्या वादात तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे.
यवतमाळ शहरातील तलाव फैल परिसरातील पॉवर हाऊसमध्ये जुन्या भांडणातून केतन सुरेश गेडाम (१७) रा. तलाव फैल याचा गुरुवारी रात्री ९.३० वाजता खून करण्यात आला. यातील आरोपी अल्पवयीन असून त्याला शहर पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले.
महिनाभरापूर्वी केतनचे वडील सुरेश गेडाम यांचा आरोपीच्या कुटुंबासोबत वाद झाला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हाही नोंदविण्यात आला. याच घटनेचा वचपा काढण्यासाठी आरोपीने गुरुवारी रात्री केतनसोबत वाद घातला. या वादात त्याच्यावर फावड्याने हल्ला करण्यात आला. त्यात केतन जागीच ठार झाला. या प्रकरणी केतनची आई विमल गेडाम यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्ह्याचा अधिक पोलीस उपनिरीक्षक राहूल किटे करत आहे.
कुंंभारी गावात थरार
पुसद तालुक्यातील कुंभारी येथे जागेच्या वादात संदीप लक्ष्मण पवार (३०) या तरुणाचा गुरुवारी रात्री दगडाने ठेचून खून केला. गोविंद राम आडे (४५), गोपा फुलसिंग आडे (६०), विकास गोपा आडे (३०) आणि जगदीश बळीराम पवार (३६) सर्व रा. कुंभारी अशी आरोपींची नावे आहेत. आडे आणि संदीप पवार यांच्यात जागेचा वाद होता. याचा वचपा काढण्यासाठी गोविंद, गोपा आणि विकास या तिघांनी खुनाचा कट रचला. आमटी रस्त्यावर एका मंदिरासमोर पार्टी आयोजित केली. या पार्टीत जगदीश पवार संदीपला घेऊन आला त्या ठिकाणी जुना वाद उफाळून आला. या वादात गोविंदा आडे याने मोठा दगड उचलून संदीपच्या डोक्यात घातला. इतर आरोपींनी दगडाने ठेचून त्याला जागीच ठार केले आणि पसार झाले. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्याचा मृतदेह मंदिराजवळ पडून असल्याचे दिसला. खंडाळा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. ठाणेदार बाळू जाधवर, जमादार राम पवार, कुणाल राठोड, साहेबराव नवलकर यांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणी संदीपचे वडील लक्ष्मण आमरू पवार यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून चौघांविरूद्ध गुन्हा दाखाल केला. वृत्त लिहिस्तोर कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. (प्रतिनिधी)

Web Title: Yavatmal, youth murders in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.