शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

...म्हणून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली; लीलाबाईंनी सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 8:58 PM

बहुजन क्रांती मोर्चाने आज पुकारलेल्या भारत बंदला यवतमाळातील मारवाडी चौकात गालबोट लागले.

यवतमाळ : बहुजन क्रांती मोर्चाने आज पुकारलेल्या भारत बंदला यवतमाळातील मारवाडी चौकात गालबोट लागले. यावेळी आंदोलकांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगितल्याने वाद निर्माण होऊन तणाव वाढला. काही आंदोलक एका दुकानात घुसले, त्यावेळी दुकानात उपस्थित असलेल्या महिलेनं त्यांच्यावर मिरचीपूड टाकली. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. मिरची पावडर टाकणाऱ्या लीलाबाई रेखवार यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली आहे. त्यावेळी त्यांनी सर्व घडलेला वृत्तांत कथन केला. लीलाबाईंशी आमच्या प्रतिनिधीनं केलेली बातचीतप्रश्न: पोलिसांतर्फे तुमचा सत्कार करण्यात येणार आहे. तुमचं अभिनंदन. कसे वाटतंय ?उत्तर - चांगले वाटते मॅडम. असं राहायला पाहिजे. पोलिसांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. प्रश्न - सकाळी नेमकं काय घडलं ? मारवाडी चौकात तुमचं दुकान आहे. त्यावेळी काय झाले ?उत्तर - सकाळी आम्ही कामच करायला आलो होतो. दुकान नेमकेच उघडले होते. कलम चौकातून तीन - चारशे लोक आले आणि त्यांनी दुकान बंद करायला सांगितले. चार-पाच जण दुकानात शिरले. त्यांनी दगडफेक सुरू केली. सामानाची नासधूस केली. प्रश्न - तुमचं दुकान कशाचं आहे ?उत्तर - आमचं दुकान नाही. आम्ही तिथे कामाला आहोत. दुकान मारवाड्याची आहे. किशोर पोद्दार म्हणून. प्रश्न - नेमकं तिथे काय काय विकलं जातं उत्तर - सगळंच आहे. किराणा आहे. मिरची पावडर. मसाल्याचे पदार्थ.. तांदूळ धान्य वगैरे सगळं आहेप्रश्न - बरं, पुढे काय झालं. दोन - तिनशे लोकं तिथे आले. मग पुढे काय झालं?उत्तर - ते दुकानात आले. त्यांनी आमच्या मालकाला सांगितलं. आम्ही दोघंच होतो दुकानात. ते आतमध्ये शिरले. गोटे वगैरे मारायला सुरुवात केली. बाहेर मिरची वगैरे होती. मी तिथेच उभी होते. ते मिरचीची फेकफाक करायला लागले. आतमध्ये शिरायला लागले. ते मारहाण करायला लागले. ते खूप कल्ला करायला लागले. त्यांनी आमच्या मालकाला धरून वगैरे घेतलं होते. आम्ही दोघंच होतो. काय करावं सुचत नव्हतं. सोबत दोन पोलीस पण होते. पण ठीक आहे. करणार काय. एवढ्या लोकांमध्ये काय करायचं ते समजलंच नाही मॅडम. प्रश्न - मग त्यावेळी तुम्ही काय केलं ?उत्तर - मग ते आतमध्ये शिरले आणि त्यांनी मारहाण केली. मग आम्हीही त्यांच्यासमोरच कल्ला केला, मग थोड्या वेळानं पोलीस आले. त्यांनी लाठीचार्ज केला. मग ते सगळे पळून गेले.प्रश्न  - बरं, तुमचं दुकान त्यांना बंद का करायचं होतं? उत्तर - मॅडम ते आंदोलन काही तरी होतं. माहीत नाहीये. त्यांनी कुठलंच बंद केलं नाही. डायरेक्ट आमच्याच दुकानात आले. तेच समजले नाही. तिकडची सगळीच दुकानं उघडी होती. ते एकदम तिकडून आले आणि त्यांनी आमच्या दुकानावर धावा बोलला. ते का केलं हेच समजलं नाही मॅडम. मी बाहेरच उभी होते तेव्हा.प्रश्न - बरं तुम्ही त्यांना विचारलं नाही बंद का करायचं आहे दुकान ? उत्तर - विचारलं ना. आमच्या मालकांनी विचारलं. आमचं तुम्हाला समर्थन आहे, तुम्ही रॅली काढत आहात, आमचं समर्थन आहे त्याला. पण आम्ही दुकान का बंद करू? त्यानंतर आठ-दहा पोरं एकदम अंगावरच आली. एकदम मारायच्या पद्धतीनेच ते अंगावर धावले. गोटे वगैरे मारले. त्यांनी खूपच धिंगाणा केला. आता एवढ्या जणांसमोर आम्ही काय करू शकतो. आम्ही दोघंच जणं होतो दुकानात. प्रश्न - मग हातात मिरची पावडर घेऊन त्यांना पळवून लावायचं कसं सुचलं तुम्हाला ?उत्तर - काही सुधरलं नाही आम्हाला. आम्हाला जे सुधरलं ते आम्ही केलं. त्यांनी फेकफाक केली आमच्या मिरचीची, मिरची पावडर सगळी पसरून गेली होती. मग आम्हाला तेव्हाच हे सुचलं. आता त्यांनी हे सगळं फेकलं. आता तेच हातात घेऊन वापरू. आता एवढे लोकं अंगावर येत आहेत. आपण कसं काय करू म्हणून. मग तेच आम्हाला काहीच नाही सुधरलं. मग तेच आम्हाला सुचलं. आम्ही आपला जीव वाचवाचा हे करत होतो. प्रश्न - बरं तुम्ही मिरची पावडर टाकल्यानंतर ते सगळे तिथून निघून गेले का ? की ते परत आलेउत्तर - नाही, ते निघलेच नाही. पोलीस आले. तेव्हा त्यांनी त्यांना मारहाण केली. काहीही होऊ शकलं असतं मॅडम. आज काहीही होऊ शकलं असतं... प्रश्न - मग तुमच्यात एवढी मोठी हिंमत कशी आली ?उत्तर - आता अंगावर येताहेत म्हटल्यावर हिंमत येणारच ना मॅडम. काही तरी संघर्ष करावाच लागेल ना. एवढे लोकं एका दमाने.. चार-पाचशे लोक इकडून तिकडून घुसत होती. त्यात मी एकटी बाई. माझंही काहीही झालं असतं त्यात. माझ्या मालकाला तर धरूनच घेतलं होतं. त्याच्यात मी एकटीच होती तिथे. मी ओरडत होते पोलिसांना. वाचवा, वाचवा म्हणून.. पोलीस असूनही ते असं का करताहेत. त्याचा व्हिडीओपण बनवला कोणीतरी तिथे. मी बोलत होते तेथे "लेडिज के आंग पे कैसा हाथ डालरे. पोलीस होने के बावजूद ऐसा क्यूँ कर रहे हैं. हम को कुछ समझमें नहीं आया.  अब हमारी जान बचाने के लिए कुछ तो करना पडेगा ना".