शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

यवतमाळला अवकाळीने झोडपले; पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी

By विशाल सोनटक्के | Updated: April 27, 2023 14:15 IST

१५२ घरांची पडझड : पिकांचे मोठे नुकसान, ४२ जनावरेही दगावली

यवतमाळ : सलग तिसऱ्या दिवशी यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. जिल्ह्यात सरासरी २४.२ मिमी पावसाची नोंद झाली असून पाच मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. या वादळी पावसात जिल्ह्यातील १५५ घरांची अंशत: पडझड झाली असून ४२ जनावरांचाही अवकाळीने बळी घेतला आहे. पावसामुळे भाजीपाला, कांदा, ज्वारीसह पपई आणि केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मागील तीन दिवसांंपासून जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस होत आहे. मंगळवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील ६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले होते. या पावसात ७८ घरांची पडझड होवून दोन जनावरेही दगावली होती. बाभूळगाव, आर्णी, दिग्रस, दारव्हा आणि घाटंजी या तालुक्यात बुधवारी सकाळपर्यंत सरासरी २० मिमी पावसाची नोंद झाली होती. बुधवारी सायंकाळी पुन्हा यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली.

बाभूळगाव, आर्णीसह अन्य तालुक्यात पावसाचा जोर होता. बाभूळगाव तालुक्यातील बाभूळगाव मंडळात अतिवृष्टी झाली असून येथे ७०.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर आर्णी तालुक्यातील जवळा मंडळात ९२ मिमी पाऊस कोसळला आहे. केळापूर तालुक्यातील चालबर्डी मंडळात ६८ मिमी तर केळापूर मंडळात ६९.७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटंजी तालुक्यातील घोटी मंडळातही अतिवृष्टी झाली असून येथे ७१.२५ मिमी पाऊस कोसळला आहे.गारपीट आणि वादळी पाऊस मुक्या जनावरांच्या जीवावर उठला आहे. बुधवारी झालेल्या पावसात लहान २३ आणि मोठे १९ अशा एकूण ४२ जनावरांचा मृत्यू झाला. तर १५५ घरांची अंशत: पडझड झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामानRainपाऊसYavatmalयवतमाळ