शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

यवतमाळच्या जलतरणपटूंना १५ सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:27 IST

अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात घेण्यात आलेल्या अमरावती विभागीय शालेय जलतरण स्पर्धेत यवतमाळच्या जलतरण पटूंनी १४, १७ व १९ वर्ष अशा तिनही वयोगटात नेत्रदीपक कामगिरी करीत तब्बल १५ सुवर्ण व १७ रजत पदकाची लयलूट करीत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश केला.

ठळक मुद्देउत्कृष्ट कामगिरी : उमरखेडचे जलतरणपटूही चमकले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात घेण्यात आलेल्या अमरावती विभागीय शालेय जलतरण स्पर्धेत यवतमाळच्या जलतरण पटूंनी १४, १७ व १९ वर्ष अशा तिनही वयोगटात नेत्रदीपक कामगिरी करीत तब्बल १५ सुवर्ण व १७ रजत पदकाची लयलूट करीत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश केला.क्रीड व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्यावतीने २१ सप्टेंबर रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ संघातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यवतमाळच्या खेळाडूंनी १९ वर्ष मुला-मुलींच्या गटात सर्वाधिक सहा सुवर्ण व नऊ रजत पदक जिंकले. त्या खालोखाल १४ वर्ष गटात ६ सुवर्ण व ७ रजत पदक प्राप्त केले. जिल्ह्यातील पदक प्राप्त खेळाडू याप्रमाणे- कौटील्य मेश्राम -१०० मीटर बटरफ्लाय-सुवर्ण व २०० मीटर बटरफ्लाय रजत, संकल्प गवई- २०० मीटर बटरफ्लाय सुवर्ण, अर्जून गावंडे १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर बटरफ्लाय सुवर्ण, शर्वरी गावंडे- ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर बँकस्ट्रोक सुवर्ण, रिशिका पटेल-२०० मीटर आय.एम, ४०० मीटर, फ्रीस्टाईल-रजत, प्राजक्ता मकेसर - १०० मीटर, २०० मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक रजत, गुणगुण चौधरी - ५० मीटर, बटरफ्लाय सुवर्ण, १०० मीटर, फ्रीस्टाईल रजत, वंशिका मुन - १०० मीटर बॅकस्ट्रोक रजत.१७ वर्ष वयोगटात- वेदांत तुमसरे -२०० मीटर, फ्री स्टाईल रजत पदक, १९ वर्ष वयोगटात- ईश्वरी गावंडे - १०० मीटर, व २०० मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक, तनया पांडे- १०० मीटर, व २०० मीटर, फ्री स्टाईल रजत, आदेश शेंडे -१०० मीटर व २०० मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक्स रजत, ४०० मीटर, आयएम सुवर्ण, दिग्विजय कनरासे ५० मीटर बटरफ्लाय सुवर्ण, स्नेहल घाडगे - ५० मीटर फ्री स्टाईल व ५० मीटर बॅक स्ट्रोक रजत, अर्जून पाटील - १० मीटर बॅक स्ट्रोक सुवर्ण, क्रिष्णा रणवले १०० मीटर व २०० मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सुवर्ण पदक. हे सर्व खेळाडू आझाद मैदान येथील शासकीय जलतरण तलावात सराव करतात. त्यांना कुणाल सिंग चौहाण, जिल्हा हौसी जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुरेश गावंडे, चंदू बिडवई, वीरेंद्र तुमसरे, हरिश शेंडे यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व पदक प्राप्त खेळाडू नागपुर येथे ३० सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करतील. खेळाडूंच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, अभय धोबे, क्रीडा भारतीचे दिलीप राखे, मनोज गढीकर, मीराताई फडणीस यांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :Hanuman Vyayam Prasarak Mandalहनुमान व्यायाम प्रसारक मंडळ