Yavatmal: भरधाव कार झाडावर धडकली, एकाचा मृत्यू, तिघे जखमी

By सुरेंद्र राऊत | Published: May 19, 2024 07:56 PM2024-05-19T19:56:49+5:302024-05-19T19:57:55+5:30

Yavatmal News: यवतमाळ येथे राहत असलेल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी यवतमाळ येथून राठाेड कुटूंबिय कारे आले हाेते. तेथून पुढे करंजी येथे जात असताना एका वळणावर अचानक जनावर आडवे आले. भरधाव कार अनियंत्रित हाेवून झाडावर धडकली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर युवकासह महिला व मुलगा गंभीर जखमी आहे.

Yavatmal: Speeding car hits tree, one dead, three injured | Yavatmal: भरधाव कार झाडावर धडकली, एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Yavatmal: भरधाव कार झाडावर धडकली, एकाचा मृत्यू, तिघे जखमी

- सुरेंद्र राऊत 
यवतमाळ  - येथे राहत असलेल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी यवतमाळ येथून राठाेड कुटूंबिय कारे आले हाेते. तेथून पुढे करंजी येथे जात असताना एका वळणावर अचानक जनावर आडवे आले. भरधाव कार अनियंत्रित हाेवून झाडावर धडकली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर युवकासह महिला व मुलगा गंभीर जखमी आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. वामन राठाेड (५४) रा. यवतमाळ असे मृताचे नाव आहे. तर अविनाश राठाेड (३२), त्यांची पत्नी ज्याेती राठाेड (२८), मुलगा अर्णव राठाेड (८) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

राठाेड कुटूंबिय कारने क्रं.(एमएच २९ टी ८६३१) यवतमाळ येथून मोहदा येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले, तेथून पुढे करंजीला जाताना एका वळणावर जनावर  आडवे आल्याने कार झाडावर आदळली. या अपघाताची माहिती पोलीस पाटील पियुष गब्रानी यांना मिळताच  त्यांनी जखमींना यवतमाळ येथे रवाना केले. पाेलिस उपनिरीक्षक नितीन सुशिर, शिपाई सूर्यकांत गित्ते यांनी अपघाताच्या घटनेचा पंचनामा केला. मृतदेह पांढरकवडा ग्रामीण रुग्णालय येते पाठविण्यात आला.

Web Title: Yavatmal: Speeding car hits tree, one dead, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.