शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

यवतमाळ : नेर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुनिता जयस्वाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 2:29 PM

नेर नगरपरिषदेच्या 18 जागांपैकी नऊ जागा आणि नगराध्यक्षपदी विजय प्राप्त करून शिवसेनेने पालिकेवर भगवा झेंडा फडकाविला आहे.

नेर (यवतमाळ) : नेर नगरपरिषदेच्या 18 जागांपैकी नऊ जागा आणि नगराध्यक्षपदी विजय प्राप्त करून शिवसेनेने पालिकेवर भगवा झेंडा फडकाविला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीनेही जोरदार मुसंडी मारल्याने शिवसेनेला गेल्यावेळी पेक्षा दोन जागा कमी मिळाल्या आहेत. नेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. सोमवारी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यात शिवसेनेला ९, काँग्रेसला चार, राष्ट्रवादीला तीन तर अपक्षांना दोन जागा मिळाल्या.

नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुनिता पवन जयस्वाल विजयी झाल्या. त्यांना आठ हजार १२३ मते मिळाली. काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. शबाना यांना पाच हजार ११९ मते प्राप्त झाली. जवळपास तीन हजार मतांच्या फरकाने जयस्वाल विजयी झाल्या. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ११ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला केवळ एक तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या. अपक्षांनीही दोन जागा पटकाविल्या होत्या. यावेळी शिवसेनेच्या जागा दोनने घटल्या आहे. अपक्षांची संख्या कायम आहे. मात्र काँग्रेसच्या जागांमध्ये तीनची भर पडली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेचा फटका बसला आहे. तथापि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने यावेळी मुसंडी मारत दोन जागा जादा पटकावल्या आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाYavatmalयवतमाळ