शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

यवतमाळात रविवारपासून ‘समता पर्व-२०१९’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:52 IST

येथील समता मैदानावर ‘समता पर्व-२०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होत आहे. याचे उद्घाटन रविवार, १९ मे रोजी सकाळी ७ वाजता गिनिज बूक आॅफ वर्ल्डमध्ये नोंद असलेले डॉ. पी.जे. सुधाकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रबोधनात्मक कार्यक्रम : पी.जे. सुधाकर करणार उद्घाटन, यवतमाळ आयडॉल ठरणार लक्षवेधक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील समता मैदानावर ‘समता पर्व-२०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होत आहे. याचे उद्घाटन रविवार, १९ मे रोजी सकाळी ७ वाजता गिनिज बूक आॅफ वर्ल्डमध्ये नोंद असलेले डॉ. पी.जे. सुधाकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.समता पर्व हे यवतमाळकरांसाठी वैचारिक प्रबोधनाची पर्वणी आहे. येथे वैचारिक मंथनासोबत मनोरंजनात्मक व प्रतिभा उंचाविण्यासाठी विविध स्पर्धा होतात. यवतमाळ आयडॉल, चित्र प्रदर्शन, समता विचार वेध सत्र, एक क्षण गौरवाचा हे कार्यक्रम येथे घेण्यात येतात. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, नरेंद्र फुलझेले, अनिल बहादुरे, डॉ. मिलिंद कांबळे, दीपक चवने, गजानन उले, संतोष मनवर, डॉ. दिलीप महाले, दीपक नगराळे, सिद्धार्थ भवरे, संदीप कोटंबे, प्रमोदिनी रामटेके, पुष्पा राऊत, अ‍ॅड. रामदास राऊत, शैलेश गाडेकर, अ‍ॅड. जयसिंह चव्हाण, जनार्दन मनवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिओ सार्इंटिस्ट सरविंदराम राहणार आहे. समता पर्वाचे संस्थापक डॉ. हर्षदीप कांबळे आणि कर्नाटकातील वक्ते रवीकीर्ती सी मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राला अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वºहाडे, सुरेश मडावी, राजुदास जाधव, अशोक वानखेडे, प्रा. माधव सरकुंडे, डॉ. दिलीप घावडे, मनोहर सहारे, भीमराव गायकवाड, प्रा. भीमराव ढेंगळे, चंद्रप्रकाश वाहने, घनश्याम भारशंकर, अ‍ॅड. मिलिंद भगत, नरेंद्र गद्रे उपस्थित राहणार आहेत.२० मे रोजी सायंकाळी यवतमाळ आयडॉलची दुसरी फेरी होणार आहे. यावेळी पत्रकार उर्मिलेश ‘समकालीन समाज और लोकतंत्र का भविष्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींना पुरस्कार दिले जाणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर गोबरे, प्रमुख अतिथी चंद्रशेखर खंदारे, विशाल जाधव, राहुल भरणे, सुनील कुंडावार, गणेश राठोड, सुनील अवचार, बाळकृष्ण सरकटे, शैलेश तेलंग, विलास काळे, प्रकाश भस्मे उपस्थित राहणार आहेत.२१ मे रोजी डॉ. रेखा मेश्राम (औरंगाबाद) यांचे ‘समताधिष्ठित मूल्य रूजविण्यासाठी स्त्रियांची भूमिका’ यावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा फुलझेले, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. लीला भेले, पल्लवी रामटेके, राखी भगत, उज्ज्वला इंगोले, सुनीता काळे, चिंतामण वंजारी, कुंदा मडावी, विद्या खडसे, ललित वाघ, संगीता शिंदे उपस्थित राहणार आहे.२२ मे रोजी समता पर्वाचा समारोप असून अध्यक्षस्थानी माणिकराव ठाकरे, तर विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, आमदार मनोहरराव नाईक, आमदार ख्वाजा बेग, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार नीलय नाईक, आमदार डॉ. अशोक उईके, आमदार प्रा. राजू तोडसाम, माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंत पुरके, नगराध्यक्ष कांचन चौधरी, सभापती प्रज्ञा भुमकाळे, अनिल आडे, बाळासाहेब मांगुळकर, राजुदास जाधव, आनंद गायकवाड, आनंद गावंडे, बिपीन चौधरी, मो. तारिक लोखंडवाला, महेंद्र मानकर, रणधीर खोब्रागडे, राजेश्वर निवल, प्रशांत नगराळे, राजू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर