यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची बाजी

By Admin | Updated: June 6, 2017 01:27 IST2017-06-06T01:27:31+5:302017-06-06T01:27:31+5:30

यवतमाळ पब्लिक स्कूलने सीबीएसई दहावीच्या निकालात १०० टक्के यशाची परंपरा याहीवर्षी कायम राखली आहे.

Yavatmal Public School students win | यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची बाजी

यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची बाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलने सीबीएसई दहावीच्या निकालात १०० टक्के यशाची परंपरा याहीवर्षी कायम राखली आहे. विशेष म्हणजे, या शाळेचे दोन विद्यार्थी विदर्भात टॉपर राहिले आहे. विदर्भात टॉपर देण्याची या शाळेची ही दुसरी वेळ आहे. २४ विद्यार्थ्यांनी गणित, समाजशास्त्र, हिंदी या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले आहे. ४२ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा अधिक गुण घेत यश मिळविले आहे. ३५ विद्यार्थ्यांचा सीजीपीए १० पॉर्इंट आहे. परीक्षेस बसलेले सर्व १३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
 

Web Title: Yavatmal Public School students win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.