लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पुसद येथे रात्रगस्त करून परत येत असलेल्या यवतमाळ पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या व्हॅनला माहूर-आर्णी रोडवरील मांगूळ गावानजीक रात्री १ वाजता भंडाराहून नांदेडकडे पोहे घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात पोलीस व्हॅनमधील सुनील केसगीर, मुश्ताक पठाण, हरीश भावेकर हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध घेतला जात आहे.
यवतमाळ पोलिसांच्या व्हॅनला अपघात, तीन कर्मचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 13:19 IST