यवतमाळला पाण्यासाठी पाच कोटींची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:45 IST2017-09-28T21:44:54+5:302017-09-28T21:45:06+5:30
यावर्षी पाऊस कमी झाल्याने यवतमाळचा पाणी प्रश्न तीव्र होणार आहे. ही शक्यता लक्षात घेता उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाच कोटींची मागणी केली.

यवतमाळला पाण्यासाठी पाच कोटींची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी पाऊस कमी झाल्याने यवतमाळचा पाणी प्रश्न तीव्र होणार आहे. ही शक्यता लक्षात घेता उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाच कोटींची मागणी केली. प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थिती मुख्यमंत्र्यांकडे मांडली जाईल, असे खासदार भावनाताई गवळी यांनी सांगितले.
महाराष्टÑ जीवन प्राधिकरण, सिंचन विभाग, नगरपरिषद अधिकाºयांची बैठक मजीप्रा कार्यालयात घेण्यात आली. नगराध्यक्ष कांचन चौधरी, मजीप्राचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले यांच्या उपस्थितीत पाणीप्रश्नावर विचार विनिमय झाला. निळोणा प्रकल्पात पाणी नाही, तर चापडोहत अत्यल्प साठा आहे. यावर बेंबळाचे पाणी आणणे हा एक उपाय आहे. मात्र, तेथून आणलेले पाणी निळोणा आणि चापडोहच्या जलशुद्धिकरण प्लांटमध्ये पोहोचविण्यासाठी ५०० हॉर्स पॉवरचा मोटारपंप आवश्यक आहे. यासाठी किमान पाच कोटींची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता विशेष बाब म्हणून पाच कोटी रुपये त्वरित देण्यात यावे, असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. प्रत्यक्ष भेट घेऊनही परिस्थिती त्यांच्याकडे मांडली जाईल, असे भावनाताई गवळी यांनी कळविले आहे.