Yavatmal : murde in Digras | दिग्रसच्या दत्तापूर वळण रस्त्यावर इसमाचा खून
दिग्रसच्या दत्तापूर वळण रस्त्यावर इसमाचा खून

यवतमाळ -  दिग्रस तालुक्यातील दत्तापुर वळण रस्त्यावर दुचाकीसह एकाचा मृतदेह पडून अवस्थेत गुरवारला ७:३० वाजता आढळला. मृतदेहाच्या डोक्यावर,मानेवर घाव असल्याने खून झालयाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 दिग्रस येथे भवानी मातेच्या मागील दत्तापुर वळण रस्त्यावर मृतक सखाराम अमरसिंग जाधव (वय-५४) रा.मरसुळ तांडा यांची पॅशन प्रो दुचाकी (क्र. एम एच १२ के एस ९६७४) ही रस्त्यावर पडून होती. त्यांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला दरीत पडून असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांना मिळाली. त्यावरून घटनास्थळी चंदेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक संघरक्षक भगत, उपनिरीक्षक सुरेश कनाके सह पोलीस ताफा पोहचला. मृतदेहाचा पंचनामा केला असता पॅशन प्रो दुचाकी, चप्पल आढळून आली. तसेच मृतकाच्या  डोक्यावर दोन खोलवर घाव व मानेवर वार दिसले.  फुटलेला मोबाईल व सिम पडलेले आढळले. मृतदेहाचा पंचनामा नातेवाइकांच्या समक्ष करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
मृतकाचा भाऊ फिर्यादी दिनेश अमरसिंग जाधव रा.याने दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Web Title: Yavatmal : murde in Digras
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.