शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

यवतमाळ एमआयडीसीत पट्टेदार वाघाचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:44 PM

शहरालगतचा एमआयडीसी परिसरात मागील महिनाभऱ्यापासून पट्टेदार वाघिणीने ठिय्या मांडला आहे. या भागात हमखास वाघिणीच्या पायाचे ठसे दिसून येतात. शहराच्या अगदी जवळ असलेल्या भागात वाघ आढळल्याने वन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. या वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी जवळपास दहा ट्रॅप कॅमेरे व मचानी बांधण्यात आल्या आहे.

ठळक मुद्देपरिसरात दहशत : ट्रॅप कॅमेरात वाघ कैद, वनविभागाकडून पाळली जातेय गुप्तता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरालगतचा एमआयडीसी परिसरात मागील महिनाभऱ्यापासून पट्टेदार वाघिणीने ठिय्या मांडला आहे. या भागात हमखास वाघिणीच्या पायाचे ठसे दिसून येतात. शहराच्या अगदी जवळ असलेल्या भागात वाघ आढळल्याने वन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. या वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी जवळपास दहा ट्रॅप कॅमेरे व मचानी बांधण्यात आल्या आहे.पट्टेदार वाघ असल्याची चर्चा मागील सहा महिन्यापासून लासीना, पिंपरी, चिंचबर्डी, कामनदेव, उमर्डा नर्सरी परिसरात होती. पिंपरी येथे वाघाने बैल, कुत्रा व एक वगार याची शिकार केल्याचीही माहिती चार महिन्यापूर्वी येथील ग्रामस्थांनी दिली. काहींना या वाघाचे दर्शनही झाले. मात्र वन विभाग ठोस पुराव्याअभावी वाघ आहे हे मान्य करण्यास तयार नव्हता. शिकार केलेल्या ठिकाणी काही पुरावेही वन विभागाला मिळाले नव्हते. यामुळे ग्रामस्थांनी कितीही आर्जव करून सांगितले तरी वन यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत होती. आता या परिसरात फिरणारा वाघ असल्याचे वन विभागाच्या लेखी स्पष्ट झाले आहे. थेट ट्रॅप कॅमेºयात हा वाघ कैद झाला आहे. शिवाय तिच्या पगमार्कवरून वाघ असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र वन विभागाची यंत्रणा याबाबत अतिशय गुप्तता बाळगून आहे.एमआयडीसीतील एका इंग्रजी शाळेच्या मागे कांजीभाई गलमानी यांचे शेत आहे. या शेतात ऊस व केळीचा बगीचा आहे. या उसातच वाघा डेरा असल्याचे सांगण्यात येते. या भागात वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहे. येथे काही ठिकाणी पगमार्कही आढळून आले आहे. वाघाला जेरबंद करून तिच्या अधिवास क्षेत्रात सोडण्याचा होत आहे. तुर्त वनविभाग वाघाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. यवतमाळ शहरालगतच वाघ आल्याने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसानशेतात वाघ असल्याचे सर्वप्रथम १० मे रोजी स्पष्ट झाले. शेतात काम करणारा गडी पांडूरंग याला वाघ दिसला. त्याने याची माहिती वन विभागाच्या यंत्रणेला दिली. त्यानंतर वन विभागाने सावकाश हालचाल सुरू केली. अनेकदा चकरा घातल्यानंतर या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले, पगमार्क घेतले. दरम्यान ३ जून रोजी हा वघा ट्रॅप कॅमेºयात कैद झाला. त्यानंतर वनविभागाने येथे लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. मात्र या सर्व घडामोडीत कांजीभाई गलमानी याचा लाखो रुपयांचा ऊस व केळी सुकत आहे. सिंचनासाठी शेतात कोणीच कामाला येण्यास तयार नाही. कडाक्याच्या उन्हात वाघामुळे हाती आलेले पीक सुकून जात आहे. वनविभागाने भरपाई द्यावी अथवा वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कांजीभाई यांनी केली आहे.