अपघातात यवतमाळचे दोन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:28 AM2018-01-02T00:28:18+5:302018-01-02T00:28:33+5:30

कारसमोर आलेल्या सशाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले.

Yavatmal killed two young men in the accident | अपघातात यवतमाळचे दोन तरुण ठार

अपघातात यवतमाळचे दोन तरुण ठार

Next
ठळक मुद्देसावर-चोंढी मार्गावर घटना : कारसमोर आलेल्या सशाला वाचविताना अपघात

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : कारसमोर आलेल्या सशाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले. ही घटना बाभूळगाव तालुक्यातील सावर ते चोंढी रस्त्यावर रविवारी मध्यरात्रीनंतर १२.४५ वाजताच्या सुमारास घडली. तर एक तरुण गंभीर जखमी झाला.
गौरव संजय सपाटे (२४), राहुल अशोक बोराडे (२३) दोघे रा. उज्वलनगर भाग-२ यवतमाळ अशी मृतांची नावे आहे. तर कार चालक विशाल लक्ष्मणराव काळे (२९) रा. वडगाव रोड यवतमाळ असे जखमीचे नाव आहे. हे तिघेही बाभूळगाव तालुक्यातील सावर येथे गेले होते. तेथून मारूती कारने यवतमाळकडे परत येत होते. त्यावेळी सावर ते चोंढीच्या दरम्यान कार समोर अचानक ससा आला. या सशाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण गेले आणि रस्त्याच्या कडेला झाडावर जाऊन आदळली. या अपघातात गौरव आणि राहुल ठार झाले. तर विशाल गंभीर जखमी झाला. गौरव हा दारव्हा येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बीए अंतिम वर्षाला शिकत होता. त्याचे वडील संजय सपाटे यवतमाळ पंचायत समितीत भांडारपाल पदावर कार्यरत आहे. राहुल बोराडे हा १२ वी पास झालेला तरुण असून त्याचे वडील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात कार्यरत आहे. जखमी विशाल काळे हा यवतमाळ नगरपरिषदेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.
आईचा आक्रोश
मुलगा उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून गौरव सपाटेच्या आईने मोबाईलवर संपर्क साधला. मात्र तो रुग्णवाहिकेच्या चालकाने उचलून अपघाताची माहिती दिली. आईने थेट यवतमाळचे शासकीय रुग्णालयात गाठले. मुलाचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला. तिचा आक्रोश पाहून रुग्णालय हेलावून गेले. तेथे उपस्थित डॉक्टरांसह पोलीस कर्मचाºयांच्या डोळ्यातही अश्रू तरळले.

Web Title: Yavatmal killed two young men in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.