शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे बुडित कर्ज ६५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 07:00 IST

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ‘एनपीए’ ४५ ते ५० टक्क्याच्या घरात पोहोचला आहे. अर्थात सुमारे ६५० कोटी रुपये कर्ज संभाव्य बुडित झाले आहे. यावरच जिल्हाधिकाऱ्यांचा संपूर्ण फोकस राहणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा ‘फोकस’ थकबाकीदारांवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संभाव्य बुडित कर्जाचा आकडा (एनपीए) ६५० कोटींवर पोहोचला आहे. बँकेचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी हे बुडित कर्ज आणि थकबाकीदार यांच्यवरच फोकस निर्माण केला आहे.सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. राज्य शासनाने या बँकेवर प्रशासक म्हणून यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांची नेमणूक केली. प्रशासक म्हणून पदभार स्वीकारताच सिंह यांनी बँकेच्या सर्व संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेऊन आढावा घेतला. सोमवारी पुन्हा या अधिकाऱ्यांची बैठक बोलविली गेली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ‘एनपीए’ ४५ ते ५० टक्क्याच्या घरात पोहोचला आहे. अर्थात सुमारे ६५० कोटी रुपये कर्ज संभाव्य बुडित झाले आहे. यावरच जिल्हाधिकाऱ्यांचा संपूर्ण फोकस राहणार आहे. हे कर्ज थकीत होण्यामागील नेमके कारण काय, थकबाकीदार कोण, बँकेने वसुलीसाठी काय प्रयत्न केले, किती नोटीस दिल्या, कुठे जप्तीची कारवाई केली का, वसुलीसाठी प्रामाणिक प्रयत्न झाले का, फिल्ड सर्वेनुसार कर्ज दिले गेले का, कर्जदारांची संपत्ती तारण ठेवून, त्याची आर्थिक क्षमता तपासून कर्ज देण्यात आले का, कर्जदारांमध्ये स्वत: संचालक अथवा त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत का, किती संचालकांच्या शिफारसींवरून दिलेले कर्ज थकीत झाले अशा विविध मुद्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा फोकस राहणार आहे.

थकीत कर्जासाठी बँकेची यंत्रणा कायम कृषी कर्ज, कर्जमाफी, व्याजमाफी, कर्जाचे पुनर्गठन, शासनाकडून न आलेला निधी आदी कारणांचा आडोसा घेताना दिसते. मात्र त्यात खरोखरच तथ्य आहे का, क्षमता असूनही कर्जदार, मोठे शेतकरी परतफेडीस टाळाटाळ करीत आहे का, किती वर्षांपासून कर्ज भरले गेले नाही, थकबाकीदार शेतकºयाचे वार्षिक उत्पन्न किती अशा विविध मुद्यांवर एनपीएच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी संपूर्ण लक्ष केंद्रीत करणार आहे. रिझर्व्ह बँकेने बँकींग क्षेत्रासाठी १२ मापदंड (पॅरामीटर) ठरवून दिले आहे. सीआरआर, एसएलआर, सीआरए, एनपीए हे त्यातील प्रमुख आहेत. या मापदंडानुसार जिल्हा बँक सध्या कोणत्या पायदानवर आहे, हे तपासले जाईल. या मापदंडानुसार बँकेला आणखी वरच्या क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे एम.डी. सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले.भरती, निवडणुकीत स्वत:हून हस्तक्षेप नाहीजिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सांगितले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक म्हणून कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आपल्याला नाही. सर्वोच्च न्यायालय व शासनानेही तसे आदेश दिले आहेत. केवळ दैनंदिन कामकाज कसे व्यवस्थित चालेल हे आपल्याला पहायचे आहे. जिल्हा बँकेची नोकरभरती, संचालक मंडळ निवडणूक हा न्यायालयाच्या अखत्यारीतील विषय असल्याने आपण स्वत:हून त्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. परंतु शासन अथवा न्यायालयाने या संबंधी काही आदेश दिल्यास त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाईल, असे सिंह यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकाऱ्यांना बँंकींगचाही अनुभवप्रशासक तथा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह आयएएस होण्यापूर्वी बँकींग क्षेत्रात कार्यरत होते. एमबीए (फायनान्स) असलेले सिंह यांनी दिल्लीमध्ये ‘येस’ बँक आणि ‘एचएसबीसी’मध्ये सहा वर्षे सिनिअर बँकींग अ‍ॅनालिसिस्ट (एसबीए) म्हणून कार्यरत होते. याच बँकींग सेक्टरचा अनुभव त्यांना आता बँकेचे प्रशासक म्हणून काम करताना उपयोगी ठरत आहे.

टॅग्स :bankबँक