यवतमाळ जिल्ह्यात एका मृत्युसह 29 जण पॉझिटिव्ह, 41 कोरोनामुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 18:24 IST2021-02-03T18:24:24+5:302021-02-03T18:24:51+5:30

 जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 377 रिपोर्ट प्राप्त झाले.

In Yavatmal district, 29 people tested positive with one death, 41 corona-free | यवतमाळ जिल्ह्यात एका मृत्युसह 29 जण पॉझिटिव्ह, 41 कोरोनामुक्त 

यवतमाळ जिल्ह्यात एका मृत्युसह 29 जण पॉझिटिव्ह, 41 कोरोनामुक्त 

यवतमाळ: गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 29 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये नेर शहरातील 61 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 41 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 377 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 29 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 348 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 466 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14539 झाली आहे. 24 तासात 41 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13645 आहे. तर जिल्ह्यात एकूण 428 मृत्युची नोंद आहे.सुरवातीपासून आतापर्यंत 143837 नमुने पाठविले असून यापैकी 14359 प्राप्त तर 268 अप्राप्त आहेत. तसेच 129030 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Web Title: In Yavatmal district, 29 people tested positive with one death, 41 corona-free