यवतमाळ बंद संमिश्र

By Admin | Updated: January 8, 2015 23:01 IST2015-01-08T23:01:28+5:302015-01-08T23:01:28+5:30

शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या यवतमाळ बंदला गुरुवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. नेताजी मार्केट, दत्त चौक, मेनलाईन, इंदिरा गांधी मार्केट

Yavatmal closed composite | यवतमाळ बंद संमिश्र

यवतमाळ बंद संमिश्र

एसटी बसवर दगडफेक : अतिक्रमण हटाव मोहिमेचा निषेध
यवतमाळ : शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या यवतमाळ बंदला गुरुवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. नेताजी मार्केट, दत्त चौक, मेनलाईन, इंदिरा गांधी मार्केट वगळता बंदचा प्रभाव दिसला नाही. दरम्यान नेताजी चौकात एसटी बसवर झालेली दगडफेकीची घटना वगळता बंद शांततेत पार पडला. पोलिसांनी शहरात सकाळपासूनच चोख बंदोबस्त लावला होता. तर पोलीस बंदोबस्त नसल्याचे कारण देत प्रशासनाने गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम थांबविली होती.
यवतमाळ शहरात शनिवार ३ जानेवारीपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. प्रशासनाचा बुलडोझर व्यावसायिकांच्या अतिक्रमणावर चालत आहे. यामुळे अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करण्यासाठी विदर्भ अन्याय निवारण समिती, फुटपाथ दुकानदारसंघ आणि फॉरर्वड ब्लॉकने संयुक्तरीत्या बंद पुकारला होता. गुरुवारी सकाळी माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. नेताजी चौकातून निघालेला हा मोर्चा मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करीत पुन्हा नेताजी चौकात आला. व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन मोर्चेकऱ्यांनी केले होते. मोर्चात माजी आमदार विजयाताई धोटे, लालजी राऊत, क्रांती राऊत, प्रभाकर काळे, शेख जाकीर, गुलाब सोळंकी, श्रीराम खिरेकर, मुकुंद दंदे, शशी यादव, प्रणेश पिलोमन, बापू डोळे, लता ढोबरे, पौर्णिमा चव्हाण, ज्योती ओंकार, शाहीन परवीन, रत्ना काजळे, शोभा गेडाम यांच्यासह शेकडो व्यावसायिक सहभागी झाले होते.
नेताजी मार्केट, मेनलाईन, इंदिरा गांधी मार्केट आणि दत्त चौक परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र आर्णी व दारव्हा मार्गावरील अनेक दुकाने अर्धे शटर लावून सुरू होते. दुपारनंतर तर या मार्गावरील संपूर्ण व्यवहार सुरू होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Yavatmal closed composite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.