यवतमाळ भाजप युवा मोर्चा पदाधिकार्यांनी वनमंत्री राठोड यांना दाखविले काळे झेंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 15:17 IST2021-02-24T15:16:36+5:302021-02-24T15:17:01+5:30
Yawatmal News वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी येथून ताफ्यासह येत असताना भारतीय जनता युवा मोर्चासह महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविला.

यवतमाळ भाजप युवा मोर्चा पदाधिकार्यांनी वनमंत्री राठोड यांना दाखविले काळे झेंडे
ठळक मुद्दे पूजा चव्हाणला न्याय देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पंधरा दिवसापासून सातत्याने चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी पोहरादेवी येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर धामणगाव देव येथेही दर्शन घेतले. तेथून ताफ्यासह यवतमाळ शहरात येत असताना मृत पूजा चव्हाण हिला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी सायंकाळी भारतीय जनता युवा मोर्चासह महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी वनमंत्री संजय राठोड यांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविला. त्यामुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.