शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञातांनी सव्वा लाखाचा कापूस पळविला, नांदेपेरा शिवारातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 17:15 IST

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश केला व बंड्याचे कुलूप तोडून ४० क्विंटलपैकी तब्बल १५ क्विंटल कापूस लंपास केला.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : नांदेपेरा येथून एक किलोमीटर अंतरावर असेलल्या पोहणा शिवारातील एका शेतकऱ्याच्या बंड्यातून अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री तब्बल सव्वा लाख रुपयांचा कापूस पळविला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रविवारी वणी पोलीस ठाण्यात शेतकऱ्याने लेखी तक्रार दाखल केली.

लगतच्या पोहणा शेतशिवारात रवी उर्फ प्रवीण जयस्वाल यांचे वणी-नांदेपेरा मार्गावर शेत आहे. या शेतात त्यांनी कपाशीचे पीक घेतले आहे. कपाशीची वेचणी केल्यानंतर ताे कापूस शेतातील बंड्यामध्ये साठवून ठेवला होता. दरम्यान, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी या शेतात प्रवेश केला व बंड्याचे कुलूप तोडून ४० क्विंटलपैकी तब्बल १५ क्विंटल कापूस लंपास केला.

या शेताजवळ एका चारचाकी मालवाहू वाहनाच्या खुणा आढळल्या असून, त्यातच हा कापूस भरून नेल्याची शंका शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. चोरट्यांनी जवळपास सव्वा लाख रुपये किमतीचा कापूस लंपास केला. रविवारी सकाळी शेतमजूर शेतात गेले असता, ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी शेतमालक रवी जयस्वाल यांनी वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी टिपर्णे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या परिसरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून, यापूर्वीही शेतातील अनेक शेतीसाहित्यचोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चाेरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcottonकापूसagricultureशेतीFarmerशेतकरीtheftचोरी