पाटणबोरी येथे जागतिक आदिवासी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:47 IST2021-08-12T04:47:33+5:302021-08-12T04:47:33+5:30
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून बजरंग सिडाम, बिरसा ब्रिगेड तालुका प्रमुख गजानन चांदेकर, उपतालुका प्रमुख ...

पाटणबोरी येथे जागतिक आदिवासी दिन
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून बजरंग सिडाम, बिरसा ब्रिगेड तालुका प्रमुख गजानन चांदेकर, उपतालुका प्रमुख विनोद कनाके उपस्थित होते. यावेळी बजरंग सिडाम यांनी जागतिक आदिवासी दिवसाबाबत मार्गदर्शन केले. तसेच अतुल कनाके, अक्षय सिडाम यांनीही मनोगत व्यक्त केले. आदिवासी तरुण समाज चळवळीत समोर आले पाहिजेत या वर आपले मत वेक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन मारोती सिडाम यांनी केले, तर आभार अनिकेत नैताम यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी समाज संघटना पाटणबोरीचे सदस्य अजय सलाम, आकाश कुडमथे, अनिकेत सिडाम, अभिषेक सिडाम, पवन गेडाम, अमोल कनाके, साई मेश्राम, रवी कुमरे, शक्ती कनाके, राहुल कनाके, जगदीश आत्राम, नितीन सिडाम, नरेश कनाके यांनी परिश्रम घेतले.
100821\1742-img-20210810-wa0005.jpg
पाटणबोरी येथे आदिवासी समाज भवनात आदिवासी दिन साजरा