वैद्यकीय महाविद्यालयात कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:21 IST2019-03-04T21:21:19+5:302019-03-04T21:21:37+5:30
येथील वसंतराव नाईक शसकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषध वैद्यकशास्त्र विभागातर्फे ‘पेस्टीसाईड पॉयझनिंग इन रूरल कम्युनिटीज, इम्प्रोव्हींग मेडिकल मॅनेजमेंट’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार अध्यक्षस्थानी होते.

वैद्यकीय महाविद्यालयात कार्यशाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शसकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषध वैद्यकशास्त्र विभागातर्फे ‘पेस्टीसाईड पॉयझनिंग इन रूरल कम्युनिटीज, इम्प्रोव्हींग मेडिकल मॅनेजमेंट’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मायकेल एडलेस्टोन (लंडन), डॉ. आयंथी करुणारत्ने (श्रीलंका), डॉ. जयकुमार, डॉ. नरसिम्हा रेड्डी, डॉ. मोहम्मद अशील, डॉ. आदित्य प्रद्युम्ना आदी उपस्थित होते. विषबाधित रुग्ण दाखल झाल्यावर त्याचे निदान कसे करायचे, रुग्णाची गंभीरता कशी ओळखायची याविषयी डॉ. मायकेल एडलेस्टोन यांनी मार्गदर्शन केले. विषामध्ये इतरही घटक मिसळवून विषप्रयोग केला असल्यास त्यावरील उपचारपद्धतीचे विविध पैलू त्यांनी यावेळी सांगितले. विषप्रयोग झालेल्या रुग्णावर घरगुती उपचारापेक्षा तातडीने रुग्णालयात आणण्याची गरज त्यांनी यावेळी मांडली. आंतरराष्ट्रीय विश्लेषक आयंथी करुणारत्ने यांनी अतिघातक विषप्रयोग झालेल्या रुग्णावरील उपचार पद्धतीचे मार्गदर्शन केले.
अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार यांनी समयोचित मार्गदर्शन केले. फवारणी विषबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती करून त्यासाठी डॉक्टरचे पथक स्थापन करण्यात आले. यामुळे रुग्णांचा मृत्यूदर कमी झाला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. शेखर घोडेस्वार, संचालन डॉ. केतकी अंबुलकर यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ. रश्मी नागदिवे, डॉ. रोहित सलामे, डॉ. दुर्गेश महाजन, डॉ. चंद्रशेखर धुर्वे, डॉ. साईनाथ हिवराळे, डॉ. व्यंकटेश आदींनी पुढाकार घेतला.