शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

आदिवासी वर्गासाठीचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 5:00 AM

जिल्ह्यातील आदिवासी नेते समाजाचे विविध प्रश्न मांडत असतात. त्यांच्यामुळेच अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निर्णय घेताना मदत मिळायची, असे सांगत १९७० पर्यंत या वर्गाला नेतृत्व नव्हते, त्यानंतर मात्र इंदिरा गांधींनी विविध कायदे करीत त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता केवळ २०१४ नंतरच प्रगती झाल्याचा देखावा केला जात असल्याचे सांगत शिंदे यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी प्रबोधिनीच्या कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागासवर्गीयातील काही मोजक्या जणांची प्रगती झाली म्हणजे आरक्षणाची गरज संपली, असे नाही, तर आजही दलित आदिवासी समाजातील कोट्यवधी कुटुंबे हलाखीचे जीवन जगत असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. वीरबापूराव शेडमाके प्रबोधिनीच्या माध्यमातून आदिवासी समाजाला प्रगतिशील मार्गावर नेण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले. शनिवारी तळेगाव येथे माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांच्या पुढाकारातून उभारलेल्या वीर बापूराव शेडमाके प्रबोधिनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, वसंतराव पुरके, संध्याताई सव्वालाखे, कीर्ती गांधी, वामनराव कासावार, आमदार वजाहत मिर्झा, मारोतराव कोवासे, विजय खडसे, आनंद गेडाम, नामदेव उसंडी, जीवन पाटील, प्रवीण देशमुख, प्रफुल्ल मानकर, भैयासाहेब देशमुख, देवानंद पवार, मनीष पाटील, अशोक बोबडे, अरुण राऊत, जितेंद्र मोघे, दशरथ मडावी, आनंद गेडाम, जावेद अन्सारी, राम देवसरकर, उत्तम गेडाम, विजय मोघे, जया पोटे, सुरेश चिंचोळकर, डाॅ. टी. सी. राठोड, वनमाला राठोड, उन्मेश पुरके, किरण मोघे, आदींची उपस्थिती होती. प्रारंभी पारंपरिक वाद्याच्या निनादात सुशीलकुमार शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील आदिवासी नेते समाजाचे विविध प्रश्न मांडत असतात. त्यांच्यामुळेच अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निर्णय घेताना मदत मिळायची, असे सांगत १९७० पर्यंत या वर्गाला नेतृत्व नव्हते, त्यानंतर मात्र इंदिरा गांधींनी विविध कायदे करीत त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता केवळ २०१४ नंतरच प्रगती झाल्याचा देखावा केला जात असल्याचे सांगत शिंदे यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी प्रबोधिनीच्या कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या. अरविंद वाढोणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर उत्तम गेडाम यांनी आभार मानले. यावेळी प्रबोधिनीच्या निर्मितीला हातभार लावणारे राहुल शिंदे, मिलिंद फुटाणे, प्रशांत कुसराम, दीपक कोरांगे, माधुरी मडावी, अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, डाॅ. चंद्रशेखर कुडमेथे, संभाजी सरकुंडे, राम चव्हाण, अजय घोडाम, सुनील ढाले, एम. झेड. कुमरे, माधव सरकुंडे, महेश कोडापे यांचा सन्मान करण्यात आला.

न्यायासाठी सनदशीर मार्गाने प्रबोधिनी करणार प्रयत्न- माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी प्रास्ताविक केले. प्रबोधिनीच्या माध्यमातून वंचितांना शिक्षित करण्याचा तसेच सनदशीर मार्गाने न्यायासाठी  प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले, प्रबोधिनी सर्वांसाठी खुली असेल, बहुजन हितासाठी तसेच मानवी जीवनाशी निगडित विषयावर मार्गदर्शन करील, असे सांगितले. तर शिवाजीराव मोघे यांनी भाजप सरकारने बोगस आदिवासींना नियमित करण्याचा प्रयत्न केल्याची टीका केली. माणिकराव ठाकरे यांनीही भाजपवर टीका करीत लोकशाही उखडून फेकण्याचे भाजपाचे मनसुबे उधळून लावा, असे आवाहन केले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्राने काळे कृषी कायदे परत घेतले. मात्र जनता भाजपाचा कावा ओळखते, असेही माणिकराव ठाकरे यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे