शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकाविना चालणार नगरपरिषदेचे कामकाज

By admin | Updated: July 21, 2014 00:23 IST

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर यवतमाळच्या नगरपरिषद सभागृहात विरोधी गटच शिल्लक नाही. सदस्य संख्येच्या एकदशांश म्हणजे चार सदस्याचे समर्थन असलेली व्यक्ती विरोधी पक्ष नेता होऊ शकते.

सर्वच पक्ष सत्तेत : सांसदीय लोकशाहीचा विसर सुरेंद्र राऊत - यवतमाळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर यवतमाळच्या नगरपरिषद सभागृहात विरोधी गटच शिल्लक नाही. सदस्य संख्येच्या एकदशांश म्हणजे चार सदस्याचे समर्थन असलेली व्यक्ती विरोधी पक्ष नेता होऊ शकते. मात्र विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी स्विकारण्यास सध्यातरी कोणी दिसत नाही. त्यामुळे विरोधकांशिवाय कामकाज चालणार आहे. सांसदीय लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याला अनन्यसाधारण महत्व असते. किंबहुना सत्ताधाऱ्यापेक्षा विरोधी पक्षनेत्यावर अधिक जबाबदारी येते. मात्र यवतमाळ नगरपरिषदेत सर्र्वच पक्षांनी सत्तेत सहभाग घेतला आहे. यवतमाळ नगरपरिषदेत आजपर्यंत अनिर्बंध सत्ता राहिली आहे. त्यामुळे शहरावर दूरगामी परिणाम करणाऱ्या चुकाही घडल्या आहेत. तीच परंपरा आताही कायम राहणार असे दिसून येते. नगरपरिषदेत विरोधी बाकावर कोणीच बसायला तयार नाही. सक्षम विरोधक म्हणून काँग्रेस पक्ष पुढे येईल असे वाटत असतानाच काँग्रेसने तडजोड स्वीकारली. केवळ सभापतीपद आणि स्थायी समिती सदस्य या दोन पदावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी नांग्या टाकल्या. नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा होत असेल तर विरोध करायचा नाही, असा आदेश काँग्रेस नेत्यांनी दिला. त्यामुळे तसा प्रयत्न कोणीच केला नाही. उलट सत्तेत भागीदारी मिळविण्यासाठी वाटाघाटी केली. नगरपरिषदेत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, अपक्ष आणि काँग्रेस नगरसेवकांनी मिळून सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसचे सात सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या सोबत आहे. यातच काँग्रेस गटनेत्याचा वाद असल्याने उरलेल्या चार काँग्रेस सदस्यापैकी कोण विरोधी पक्षनेता म्हणून पुढे येणार हेही निश्चित नाही. नगरपरिषदेत आतापर्यत अनिर्बंध सत्ता असल्याने विकासात अनेक उणिवा कायम आहेत. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. शहरात होत असलेल्या अवैध बांधकामाला विरोधच झाला नाही. नगरपरिषदेतील कंत्राटाचे दर वाढविताना शिक्षणाच्या सोयी सुविधाकडे कोणीच लक्ष दिले नाही. अर्थसंकल्पात शिक्षण आणि क्रीडा या सारख्या महत्वपूर्ण बाबींसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणीच झाली नाही. आजही शहरातील मुख्या बाजारपेठसह सर्वाजनिक ठिकाणी महिला प्रसाधन गृहाची समस्या कायम आहे. शहरातील मैदानावर धार्मिक स्थळाचे अतिक्रमण झाले आहे. शहरावर लगतच्या ग्रामपंचायतीचा वाढता दाब कोणीच लक्षात घेतला नाही. रस्ते, नाल्या पथदिवे आणि कचरा सफाई हिच नगरपरिषदेची जबाबदारी मानण्यात आली. पार्कीगअभावी अपघात वाढले आहे. आताही विरोधकाविनाच नगरपरिषदेचे कामकाज चालणार आहे.