समन्वय व एकजुटीने काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:13 IST2017-11-19T23:03:57+5:302017-11-19T23:13:42+5:30
अधिकाºयांनी एकमेकांशी समन्वय ठेवून एकजुटीने योजना कार्यान्वित कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी येथील तहसील कार्यालयात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत केल्या.

समन्वय व एकजुटीने काम करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून एकजुटीने योजना कार्यान्वित कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी येथील तहसील कार्यालयात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत केल्या.
जलयुक्त शिवार, कायदा व सुव्यवस्था, तालुक्यातील पाणी टंचाई, नाफेड सोयाबीन खरेदी, रोहयो आदी बाबींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी जयंत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे, तहसीलदार अमोल पोवार, ठाणेदार अनिल किनगे, मुख्याधिकारी धीरजकुमार गोहळ, कृषी अधिकारी सचिन राठोड, नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार, विद्युत कंपनीचे उपअभियंता सतीश कानडे आदी उपस्थित होते. तहसीलमधील प्रत्येक विभागाची पाहणी जिल्हाधिकाºयांनी यावेळी केली. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निवडणूक सामान्य ज्ञान स्पर्थेत प्रथम आलेला शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी सिध्दांत संतोष अरसोड आणि नेहरू महाविद्यालयाची विद्यार्थिनी पायल सिध्दार्थ खोब्रागडे यांना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.