महसूल कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:29 IST2019-07-30T21:27:50+5:302019-07-30T21:29:37+5:30
महसूल कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन छेडले आहे. यवतमाळातही कर्मचाºयांनी मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले. नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देऊनही ग्रेड पे मात्र वर्ग तीनचा दिला आहे.

महसूल कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून काम
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महसूल कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन छेडले आहे. यवतमाळातही कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले.
नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देऊनही ग्रेड पे मात्र वर्ग तीनचा दिला आहे. हा ग्रेड पे ४३०० वरून ४६०० करण्यात यावा. महसूल लिपिकांचे पदनाम महसूल सहायक करण्यात यावे. अव्वल कारकून संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रृटी दूर करावी. नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ टक्क्यावरून २० टक्के करण्यात यावे. शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्यात यावी आदी मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या. या आंदोलनात जिल्ह्यातील २४०० कर्मचाºयांनी सहभाग झाले. ९ आॅगस्टला अांदोलनाचा दुसरा टप्पा आहे.
१० आॅगस्टला लेखनी बंद, २१ आॅगस्टला सामूहिक रजा, २८ आॅगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक संप, ५ सप्टेंबरपासून बेमुदत संप केला जाणार आहे. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष गजानन ठके, सरचिटणिस नंदू बुटे, आशिष जयसिंगपुरे, गोपाल गायकवाड, श्याम मॅडमवार, अतुल देशपांडे, संजय भास्करवार, दिलीप कडासने, अजय भाविक, विनोद उन्हाळे, सतीश कांबळे, नितेश वाढई, विलास जाधव, मनोज राठोड, संदीप गायकवाड, दत्ता निंबाळकर आदी सहभागी होते.