शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

महिला एसटी वाहकांचा गणवेश अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:19 PM

राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेश धारण करून तिकीटवाटपाची कामगिरी करणाऱ्या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे़ मात्र या गणवेशाबद्दल महिला वाहकांमध्ये प्रचंड रोष असून पूर्वीचाच गणवेश देण्यात यावा, अशी मागणी महिला वाहकांनी केली आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा येथे निवेदन : जुनाच गणवेश कायम ठेवण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेश धारण करून तिकीटवाटपाची कामगिरी करणाऱ्या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे़ मात्र या गणवेशाबद्दल महिला वाहकांमध्ये प्रचंड रोष असून पूर्वीचाच गणवेश देण्यात यावा, अशी मागणी महिला वाहकांनी केली आहे.हा नवीन गणवेश शाळकरी मुलींसारखा असून ग्रामीण भागात असा विदूषकी गणवेश घालून वाहकाची कामगिरी करताना चेष्टेला सामोरे जावे लागत आहे. दिलेले गणवेश हे योग्य मापाचे नसल्यामुळे तंग पॅन्ट, ढगळे कुडते अडकवून महिला वाहकांना बुजगावण्यासारखे वावरावे लागत आहे. सदरच्या विचित्र गणवेशाबद्दल महिला वाहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हा गणवेश ठरविताना काही मोजक्याच प्रतिनिधींना बोलावून संमती घेण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात हा गणवेश धारण केल्यानंतर अनेक असुविधा निर्माण होत असल्याची भावना महिला वाहक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे नवीन गणवेशाऐवजी पूर्वीचाच गणवेश द्यावा, अशी मागणी पांढरकवडा येथील महिला वाहकांनी यवतमाळ येथील कामगार अधिकारी सुनील मडावी यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ