शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जावयाच्या मदतीने प्रेयसीनेच आवळला प्रियकराचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 10:37 IST

मृताचे गेल्या काही दिवसांपासून गावातीलच विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून ते दोघे एकमेकांना लपूनछपून भेटायचे. ही बाब महिलेच्या जावयाला खटकत होती.

ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी राजूर कॉलरीत सापडला मृतदेह महिलेसह भाटव्याला अटक

यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात प्रेयसीनेच जावयाच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची बाब चौकशीअंती उजेडात आली. १९ डिसेंबरच्या रात्री राजूर कॉलरी येथे ही घटना उजेडात आली हाेती. वणी पेालिसांनी या प्रकरणाचा चहूबाजूंनी तपास करून घटनेचा उलगडा करीत मृताची प्रेयसी व जावयाला गुरुवारी अटक केली.

अतुल सहदेव खोब्रागडे असे मृताचे नाव असून, तो राजूर कॉलरी येथील चुनाभट्टीवर काम करीत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचे त्याच गावातील सोनू राजू सरावने (२५) या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून अतुल खोब्रागडे व सोनू सरावने हे लपूनचोरून भेटायचे. ही बाब सोनूचा जावई हर्षद अंबादास जाधव याला खटकत होती. यावरून सोनू व हर्षदमध्ये अनेकदा वादही झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

१९ डिसेंबरला सायंकाळी नेहमीप्रमाणे गावालगत असलेल्या सोनूच्या दुसऱ्या घरात अतुल व सोनू एकमेकांना भेटले. काही वेळानंतर तेथे हर्षदही पोहोचला. या ठिकाणी सोनू, हर्षद व अतुल यांच्यात वाद झाला. या वादात सोनू व हर्षद या दोघांनी मिळून घरातच अतुलच्या तोंडावर उशीने दाबले. त्यानंतर गळा दाबून त्याला ठार मारले. प्रकरण अंगलट येईल, या भीतीने या दोघांनी अतुलचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा देखावा निर्माण केला. त्याचा मृतदेह घरातून ओसरीत आणून ठेवण्यात आला.

२० डिसेंबरच्या सकाळी त्या ठिकाणी मृतदेह पडून असल्याचे काही लोकांना दिसले. या संदर्भात लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. एसडीपीओ संजय पुज्जलवार, ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह विच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. अतुलचा मृत्यू नैसर्गिक की अनैसर्गिक याबद्दल तर्कवितर्क सुरू असतानाच शवविच्छेदन अहवालातून त्याचा गळा आवळून खूनच झाल्याची बाब पुढे आली. विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रार देण्यासाठी मृताचे एकही नातेवाईक पुढे आले नाहीत. त्यामुळे अखेर या घटनेत फिर्यादीच पोलीस बनले. साहाय्यक फौजदार डोमा भादीकर यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी वर्तविली.

उलटे बूट, छातीवर मोबाईल अन् स्वेटर मृतदेहाशेजारी

राजूरा येथील घटनास्थळी घराच्या वस्तीत अतुल खोब्रागडेचा मृतदेह पडून होता. यावेळी त्याच्या डाव्या पायातील बूट उजव्या पायात होता, तर उजव्या पायातील बूट डाव्या पायात होता. त्याचा मोबाईल त्याच्या छातीवर ठेवून होता, तर अंगातील स्वेटर बाजूला पडून होते. त्यामुळे हा खूनच असल्याच्या शंकेची पाल पोलिसांच्या मनात चुकचुकली आणि पोलिसांनी त्या दिशेने तपास करून अवघ्या तीन दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू