वादळाने वणीचे विश्रामगृह अस्थिपंजर

By Admin | Updated: June 2, 2017 01:50 IST2017-06-02T01:50:53+5:302017-06-02T01:50:53+5:30

शनिवारी आलेल्या वादळाच्या तडाख्यात वणीच्या विश्रामगृह अस्थिपंजर बनले आहे. विश्रामगृहावरील छत उडून गेल्याने ईमारत

Winters Rest House Oshippinger | वादळाने वणीचे विश्रामगृह अस्थिपंजर

वादळाने वणीचे विश्रामगृह अस्थिपंजर

अधिकारी फिरकेना : लाखो रुपयांचे साहित्य उघड्यावर, पाण्याचाही ठणठणाट
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शनिवारी आलेल्या वादळाच्या तडाख्यात वणीच्या विश्रामगृह अस्थिपंजर बनले आहे. विश्रामगृहावरील छत उडून गेल्याने ईमारत बोडखी झाली असून त्याच्या दुरूस्तीला अद्यापही सुरूवात झाली नाही. एव्हढेच नाही तर ही घटना घडून पाच दिवस झालेत, मात्र बांधकाम विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने विश्रामगृहात जाऊन साधी पाहणीदेखील केली नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे साहित्य उघड्यावर पडून आहे.
शनिवारी सायंकाळी वणी परिसरात वादळी पाऊस झाला. हे वादळ इतके भीषण होते की, वणीती ल शासकीय विश्रामगृहातील व्हीआयपीसह तीन खोल्या व भोजन कक्षावरील छत वादळाने उडवून नेले. या घटनेवरून पाच दिवस लोटलेत. छताचा ढाच्या विश्रामगृहाच्या मागील बाजूस तसाच पडून आहे. या वादळामुळे विश्रामगृह परिसरातील दोन मोठी झाडेही उन्मळून पडली. मात्र ्रती गुरूवारी पाचव्या दिवशी तशीच पडून आहेत. उन्मळून पडलेल्या त्या झाडांची विल्हेवाट लावण्याची गरजही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटली नाही.
गेल्या काही महिन्यांपासून वणीच्या शासकीय विश्रामगृहाला समस्यांच्या वाळवीने पोखरून टाकले आहे. येथे पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. अस्तित्वात असलेला बोअर आटल्याने गरजेनुसार टँकरने पाणी मागविले जाते. अनेकदा पाणीच उपलब्ध होत नसल्याने येथे विश्रामासाठी थांबणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. पाणी नसल्याने कुलरही बंद असतो. त्यामुळे उकाड्याचा सामना करावा लागतो. विश्रामगृहातील व्हीआयपी रुमधील वातानुकुलीत यंत्रदेखील व्यवस्थित चालत नाही.

Web Title: Winters Rest House Oshippinger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.