शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

वणीचा इंग्रजकालीन शिंगाडा तलाव टाकतोयं कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:04 IST

शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या शिंगाडा तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले असताना ‘लोकमत’ने ही बाब वृत्तमालिकेच्या माध्यमातून पुढे आणली. त्याची दखल घेत आता या तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. लवकरच हा तलाव कात टाकणार आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’चा पाठपुरावा; सौंदर्यीकरणाच्या कामाचा श्रीगणेशा

म.आसिफ शेख।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या शिंगाडा तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले असताना ‘लोकमत’ने ही बाब वृत्तमालिकेच्या माध्यमातून पुढे आणली. त्याची दखल घेत आता या तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. लवकरच हा तलाव कात टाकणार आहे.ब्रिटिशकाळात वणी हा जिल्हा होता. परिसरातील जलस्त्रोत जीवंत ठेवण्यासाठी त्या काळात इंग्रजांनी तीन तलावांची निर्मिती केली. मात्र यापैकी दोन तलाव अतिक्रमणाने गिळंकृत केले. त्यामुळे सध्या केवळ शिंगाडा तलावाचे अस्तित्व कायम आहे. इंग्रजांनी त्यावेळी तलावाच्या सजावटीसाठी तलावात तीन मोठे बुरूजही उभे केले होते. परंतु कालांतराने वणी जिल्ह्याला घरघर लागली आणि यवतमाळ हा जिल्हा बनला. वणीत पालिकेची स्थापना झाली तेव्हापासून आजतागायत या तलावाकडे दुर्लक्षच झाले. परिणामी या तलावाची अवस्था बिकट झाली. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. परिणामी जलवाहिन्या बंद झाल्या. लगतच्या विहिरी, बोअरदेखील आटल्या. या तलावातसुद्धा ३० टक्के अतिक्रमण झाले आहे. तलावाची अवस्था बिकट झाल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे. मच्छिमार सहकारी संस्थेने या तलावाच्या खोलिकरणासाठी निवेदन दिले होते. ‘लोकमत’ने या विषयात वृत्तमालिका प्रकाशित केली. त्याची दखल घेण्यात आली. तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सिंचन विभागामार्फत करण्यात येणार असून त्याचे कंत्राट खामगाव येथील एका कंपनीला देण्यात आले आहे.संबंधित कंपनीला तलाव सौंदर्यीकरणाचा चांगला अनुभव असून तो तलावासाठी फायदेशीर ठरणार आहे. सौंदर्यीकरणासाठी तलावातील संपूर्ण पाणी सोडण्यात आले. गंभीर बाब ही की, शहरात गटाराचे पाणी तलावात येत असल्यामुळे तलाव सुकण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे ज्या नाल्यांमधून तलावात पाणी येते, त्या नाल्या बंद कराव्या, असे पत्र मच्छिमार सहकारी संस्थेने नगरपालिकेला दिले आहे. मात्र आचारसंहितेमुळे यासंदर्भातील निविदा काढण्यास अडचण येत आहे. तलावाच्या कंत्राटदाराने एका दिवसातच या तलावाचे सर्व्हेक्षण केले असून जेसीबीद्वारे तलावातील झाडे तोडली जात आहे. तसेच तलावात अस्तित्वात असलेले पाणी एकत्रित करण्यात येत आहे. १ मेपासून कामाचा वेग वाढणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा मानस कंत्राटदाराने व्यक्त केला. हा तलाव पूर्वी संपूर्ण विदर्भात शिंगाडा तलाव म्हणून प्रसिद्ध होता. शिंगाडा खरेदी करण्यासाठी विदर्भातील मोठे व्यापारी येथे येत असत. यावरच स्थानिक भोई समाजबांधव आपली उपजिविका चालवायचे. सोबतच या तलावात मासेमारीदेखील केली जात असे. तलावाचे सौंदर्यीकरण व खोलीकरणासाठी यापूर्वी दोनवेळ भूमिपूजन करण्यात आले होते. तसे फलकही त्याठिकाणी लावण्यात आले होते. परंतु कालांतराने काम रखडले. तलावाची रचना अतिशय चांगली असून हा तलाव गावाच्या मधोमध आहे. या तलावात बोटींगची व्यवस्था केल्यास पर्यटनाच्या दृष्टीने सुविधा निर्माण होणार आहे. सोबतच उत्पन्नातही भर पडणार आहे.