शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

धावत्या एसटीच्या चाकांचे बोल्ट निघतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 6:00 AM

मंगळवार सकाळच्या या प्रकाराने एसटी महामंडळाच्या यांत्रिक विभागातील बोगस कामाचा परिचय आला. यवतमाळ आगाराची ८०७३ क्रमांकाची बस दातोडीसाठी गेली. तेथून यवतमाळला परतत असताना मार्गात या बसच्या उजव्या बाजूचे चाक डवंडळत असल्याचे मागच्या वाहनधारकाला दिसले. ही बाब उशिरा लक्षात आली असती तर चाक निखळून बस उलटून अपघात झाला असता.

ठळक मुद्देदातोडी फेरी : यंत्र विभागातील दुर्लक्षितपणा, प्रवाशांच्या जीविताला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण भागातील रस्त्यावरून एसटी बस धावत होती... मागाहून आलेल्या वाहनाने एसटी बस गाठत चालकाला सांगितले... अहो, तुमच्या बसचे चाक निखळून पडत आहे... त्याचवेळी प्रवाशांच्या कानावर ही वार्ता पडली... बस थांबताच त्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.मंगळवार सकाळच्या या प्रकाराने एसटी महामंडळाच्या यांत्रिक विभागातील बोगस कामाचा परिचय आला. यवतमाळ आगाराची ८०७३ क्रमांकाची बस दातोडीसाठी गेली. तेथून यवतमाळला परतत असताना मार्गात या बसच्या उजव्या बाजूचे चाक डवंडळत असल्याचे मागच्या वाहनधारकाला दिसले. ही बाब उशिरा लक्षात आली असती तर चाक निखळून बस उलटून अपघात झाला असता. आगारातील यांत्रिक विभागातून झालेली हयगय प्रवाशांच्या जीवावर बेतली असती. या बसमध्ये ७० प्रवासी होते.यापूर्वीही बसची चाके निखळून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यानंतरही काही कामगारांकडून बसच्या मेंटनन्सकडे दुर्लक्ष केले जात आहे. अर्ध्यातच प्रवास रखडत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विभागाशी आणि आगाराशी संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.बसफेऱ्यांचा अर्धवट प्रवास, प्रवाशांना होतोय नाहक त्रासयवतमाळ आगारातून सोडल्या जाणाऱ्या काही बसेसच्या फेऱ्या अर्धवट होत असल्याची माहिती आहे. बसफेरीसाठी आवश्यक ती पूर्ण तयारी झालेली असताना काही चालक, वाहकांकडून जाणीवपूर्वक फेरीला विलंब केला जातो. यात वेळ गेल्यामुळे लागूनच असलेली दुसरी फेरी टाळण्यासाठी हा उपद्व्याप केला जात आहे. प्रामुख्याने यवतमाळ-धामणगाव बसफेऱ्यांबाबत हा प्रकार घडत असल्याची माहिती आहे. २६ सप्टेंबर रोजी शेड्यूल नं.१२, ५४, ५५, २२, १४०, १४१ बाभूळगाववरूनच परत आले. धामणगाव किंवा पुलगाव फेऱ्या पूर्ण केल्या नाही. या प्रकारात महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. शिवाय बाभूळगावपुढील प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागली. वारंवार घडणाऱ्या या प्रकारावर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :state transportएसटी