शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

किन्ही जवादे आश्रमशाळेची दुरावस्था

By admin | Updated: November 15, 2014 02:12 IST

येथील शासकीय आश्रमशाळेची दुरावस्था झाली असून याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.शासकीय आश्रमशाळेचे अर्धे सत्र झाले असले तरी ...

किन्ही(जवादे) : येथील शासकीय आश्रमशाळेची दुरावस्था झाली असून याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शासकीय आश्रमशाळेचे अर्धे सत्र झाले असले तरी विद्यार्थ्यासाठी आवश्यक सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो. विद्यार्थ्यांना शाळेत पिण्यासाठी व आंघोळीसाठी पाणीच मिळत नाही. विद्यार्थ्यांना शाळेपासून ५०० मिटर लांब असलेल्या गावातील स्मशानभूमीतील हँडपंपावर जावून आपले कपडे धुवावे लागतात तसेच आंघोळ करावी लागते. याबाबत मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता, याबाबत आम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली असून लवकरच यासंदर्भात योग्य व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. परंतु सहा महिने झाल्यावरही या तक्रारींची दखलच घेतली गेली नसल्याचे दिसून येते. या शाळेने विद्युत बिल न भरल्यामुळे वीज कंपनीच्या वडकी कार्यालयाने शाळेचा विद्युत पुरवठा बंद केला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहात विजेशिवाय राहावे लागले आहे. शाळेत सांस्कृतिक भवन आहे. परंतु या भवनावर टीन नाहीत. पावसाळ्यात तर या भवनात पाणी साचलेले असते. वादळामुळे उडालेली टीन अद्याप टाकण्यात आली नाहीत. शासनाने याठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प दिलेला आहे. परंतु तो शासकीय असल्यामुळे शिक्षकांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे त्याचे सुटे भाग शाळेच्या परिसरात तुटलेल्या अवस्थेत पडलेले दिसून येतात. शाळेचा परिसर गलिच्छ असून अशाच वातावरणात विद्यार्थ्यांना जेवण करावे लागते. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरमध्ये सर्वत्र कचरा जमलेला आहे. अनेक शिक्षक या क्वार्टरमध्ये राहातच नाही. सदर प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट दिली असता शाळेत केवळ दोन शिक्षक उपस्थित होते. उर्वरित सर्व शिक्षक २५ ते ३० किलोमीटर अंतरावरून ये-जा करतात. त्यामुळे ते वेळेवर पोहोचू शकत नाही. एकीकडे शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये शासन खर्च करते. परंतु अधिकारी व शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे शासनाचे या मूळ हेतूला हरताळ फासल्या जात असल्याचे दिसून येते. याकडे वरिष्ठांनी त्वरित लक्ष घालून या आश्रमशाळेचा कारभार सुधारावा, अशी मागणी पालक वर्गांमधून होत आहे. (वार्ताहर)