‘जबाब दो’ पदयात्रेचे मंगरूळ येथे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:26 IST2018-10-30T22:25:31+5:302018-10-30T22:26:10+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘जबाब दो’ पदयात्रेचे तरोडा, मंगरूळ येथे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्त्वात सोमवारी आर्णी येथून पदयात्रेला सुरुवात झाली.

‘जबाब दो’ पदयात्रेचे मंगरूळ येथे स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी/मंगरूळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘जबाब दो’ पदयात्रेचे तरोडा, मंगरूळ येथे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्त्वात सोमवारी आर्णी येथून पदयात्रेला सुरुवात झाली. रात्री तरोडा येथील मारोती देवस्थानात मुक्काम होता. याठिकाणी सरपंच ताई भेडेकर, भाऊराव गावंडे यांनी स्वागत केले.
मंगळवारी सकाळी १० वाजता पदयात्रेचे मंगरूळ येथे आगमन झाले. सरपंच किसनराव भेडेकर, उपसरपंच अजाबराव वलके यांनी या यात्रेचे स्वागत केले. यावेळी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया, नाना गाडबैले, चिराग शहा, राजू पाटील, वर्षा निकम, मीनाक्षी सावळकर, सारिका ताजने, सारिका ठोमरे, सतीश मानधना, रवी नालमवार, नरेश ठाकूर, संजय मेश्राम, बाळासाहेब काळे, बाबू पाटील, साहेबराव पाटील, धोंडीराम बोरूलकर, फिडेल बायदाणी, प्रकाश कुडसंगे, लालसिंग राठोड, सुधाकर निखाडे, सलीम खान, राहुल कान्हारकर, लक्ष्मण पाटील, नितीन कापसे, संदीप बुटले, चिराग शाह, यासीन नागानी, गुड्डू तिवारी, उमेश ठाकरे, नारायण गिलबिले, राजेंद्र शिवरामवार, रमेश सोळंके आदी उपस्थित होते.