तहानग्रस्त ढाणकीला शेतातून पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST2020-03-04T05:00:00+5:302020-03-04T05:00:21+5:30
उमा पाटील चंद्रे यांनी आपल्या शेतातील विहिरीतून ढाणकीवासीयांसाठी पाईप लाईन टाकली. ढाणकीत वेगवेगळ्या आठ ठिकाणी नळ बसवून ढाणकीच्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. उन्हाळ्याची चाहूल नुकतीच सुरु झाली आहे. त्यामुळे ढाणकीवासीयांची आतापासूनच पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. ही समस्या जाणून चंद्रे पाटील यांनी उदारता दाखविली.

तहानग्रस्त ढाणकीला शेतातून पाणीपुरवठा
उदय पुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ढाणकी : कायमस्वरूपी पाणीटंचाईग्रस्त गाव म्हणून आता ढाणकी सर्वपरिचित झाले आहे. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात या टंचाईतून गावकऱ्यांची सुटका होणार आहे. कारण एका शेतकऱ्याने जलदूत बनून आपल्या शेतातून संपूर्ण गावासाठी पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. ओमा पाटील चंद्रे असे या दानवीर शेतकºयाचे नाव आहे.
उमा पाटील चंद्रे यांनी आपल्या शेतातील विहिरीतून ढाणकीवासीयांसाठी पाईप लाईन टाकली. ढाणकीत वेगवेगळ्या आठ ठिकाणी नळ बसवून ढाणकीच्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. उन्हाळ्याची चाहूल नुकतीच सुरु झाली आहे. त्यामुळे ढाणकीवासीयांची आतापासूनच पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. ही समस्या जाणून चंद्रे पाटील यांनी उदारता दाखविली.
मागील काही दिवसांपासून पाण्याविना ढाणकीवासीयांची तडफड सुरू आहे. बाहेरगावच्या मुलीसुद्धा ढाणकीमध्ये देण्यासाठी पाहुणे धजावत नव्हते. प्रभाग १, २, ३ आणि ४ मधील नागरिकांना या नळ योजनेचा फायदा होणार आहे.
बाजार समिती सभापतींच्या हस्ते प्रारंभ
ओमा पाटील चंद्रे यांच्या पत्नी नुकत्याच नगरपंचायतमध्ये निवडून गेल्या. समाजसेवेचा हा वसा बाजार समितीचे सभापती बाळू पाटील चंद्रे यांच्याकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. बाळू पाटील चंद्रे यांच्या हस्तेच पूजन करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रभाग २ व ३ मधील नागरिक उपस्थित होते.