शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

चापडोहचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:58 IST

चापडोह प्रकल्पातून शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवारपासून ठप्प झाला. निळोणा प्रकल्पाचे पाणीही कोणत्याही क्षणी संपण्याची शक्यता आहे. तर गोखीच्या पाण्यावर केवळ ७० हजार नागरिकांचीच तहान भागविली जाणार आहे.

ठळक मुद्देअर्ध्या शहराची भिस्त टँकरवर : गोखीचे पाणी ७० हजार लोकसंख्येला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चापडोह प्रकल्पातून शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवारपासून ठप्प झाला. निळोणा प्रकल्पाचे पाणीही कोणत्याही क्षणी संपण्याची शक्यता आहे. तर गोखीच्या पाण्यावर केवळ ७० हजार नागरिकांचीच तहान भागविली जाणार आहे. परिणामी अर्ध्याअधिक यवतमाळ शहराची भिस्त आता केवळ टँकरच्या पाण्यावरच आहे. त्यामुळे आगामी काळात शहरात पाण्यासाठी हाहाकार उडण्याची शक्यात आहे.यवतमाळ शहराला चापडोह आणि निळाणा धरणाच्या मृत साठ्यातून पाणी पुरवठा केला जातो. तीन आठवड्यातून एकदा नाळाद्वारे पाणी पुरवठा तोही अनियमित होत आहे. शहरात चापडोह आणि निळोणा असे झोन तयार करून पाणी पुरवठा केला जात होता. चापडोह प्रकल्पातून वाघापूर, पिंपळगाव, लोहारा, वैभवनगर, सुयोगनगर, दर्डानगर टाकी या ठिकाणी पाणी पुरवठा होत होता. दरम्यान गोखी प्रकल्पाचे पाणी यवतमाळात आणण्याचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहे. त्या प्रकल्पाचे पाणी सुयोगनगर, दर्डानगर आणि लोहारा या तीन टाक्यांमध्ये सोडले जाणार आहे. आता चापडोहचे पाणी संपल्याने वाघापूर, पिंपळगाव, वैभवनगर टाकीतून होणारा पाणीपुरवठा पूर्णत: बंद झाला आहे.वाघापूरच्या टाकीवरून बांगरनगर, अग्रवाल ले-आऊट, लोखंडे प्लॉट, जिल्हा परिषद कॉलनी, अभिनव कॉलनी, सेमीनरी कंपाऊंड, राजेंद्रनगर, वंजारी फैल, तलावफैल, कॉटन मार्केट, गांधीनगर, गोदाम फैल, मधुबन सोसायटी, केशव पार्क, कमलापार्क ते चांदोरेनगर, मोहा गावठानापर्यंत पाणीपुरवठा होत होता. पिंपळगाव टाकीतून शिवगड मंदिर, विसावा कॉलनी, पोलीस मित्र सोसायटी, आकृती पार्कसह गजानन नगरी, रजनी पार्क, बालाजीनगर, शंकरनगर या भागात पुरवठा केला जात होता. वैभवनगर टाकीवरून वैभवनगर, महात्मा फुले सोसायटी, राऊतनगर, चिंतामणीनगर, चाणाक्यनगर, सिद्धेश्वरनगर, वाघापूर टेकडी, राधाकृष्णनगरी, मैथिलीनगर, शिवाजीनगर, सानेगुरुजीनगर, गायत्रीनगर, आठवले ले-आऊट, वाघाई नगरी, विलासनगर या परिसरात पाणीपुरवठा केला जात होता. यवतमाळ शहराच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन हे ४० टक्के चापडोह आणि ६० टक्के निळोणा असे करण्यात आले होते. बुधवारी विठ्ठलवाडी व बांगरनगर परिसरात नळ सोडण्यात आले. मात्र तासाभरातच हा पुरवठा ठप्प झाला. अचानक नळ बंद झाल्याने या भागात नागरिकांनी रोष व्यक्त केला. थेट जीवन प्राधिकरण कार्यालय गाठून त्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला.जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निळोणा प्रकल्पाचाही पाणीपुरवठा कोणत्याही क्षणी ठप्प होऊ शकतो. अशा स्थितीत केवळ गोखी प्रकल्पावरच भिस्त आहे. त्या प्रकल्पाच्या मर्यादा लक्षात घेता तीन टाक्यांवर पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू आहे. उर्वरित शहरात गोखीचेच पाणी टँकरच्या माध्यमातून पोहोचविले जात आहे. या प्रकल्पाच्या प्लॉन्टवर तान वाढल्याने तेथील मर्यादाही उघड होत आहे.श्रेयासाठी लोकार्पणाची घाईसंपूर्ण शहर पाणीटंचाईने होरपळत असताना राजकीय मंडळी मात्र श्रेय घेण्यात धन्यता मानत आहे. खासदारांनी प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर दोन दिवसातच पालकमंत्री पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला म्हणून गोखीच्या पाण्याचे मंगळवारी लोकार्पण केले. तसे फलकही लोहारा परिसरात लावण्यात आले. प्रत्यक्षात मात्र कामाची बुधवारी ट्रायल घेत असतानाच दोन वेळा पाईप उखडले गेले. त्यामुळे १ मेपर्यंत पाणी मिळणार असा शब्द देणाऱ्या नेते मंडळीला तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. गोखीचे पाणी शहरात येत असले तरी केवळ एका भागातील ७० हजार नागरिकांचीच तहान भागविणार आहे. उर्वरित एक लाख ८० हजार नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सध्या तरी कायम आहे. बेंबळाच्या पाण्याबाबत अधिकृतपणे यंत्रणेतून कुणीच बोलायला तयार नाही. राजकीय मंडळी मात्र ठासून आश्वासने देत आहे.चापडोहचा पुरवठा बुधवारी बंद पडला. निळोण्याबाबतही आशादायक चित्र नाही. गोखी प्रकल्पातून मर्यादित स्वरूपात व्यवस्था केली जात आहे. बेंबळाचे पाणी मे अखेर येण्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी संयम ठेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.- स्वप्नील तांगडेउपविभागीय अधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई