शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडवर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:20 IST

पैनगंगा नदीसह संपूर्ण तालुक्यात इसापूर धरणाच्या कालव्याचे जाळे असतानाही तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तर अपुºया पावसाने हिवाळ्यातच पाणीटंचाई तीव्र झाली आहे.

ठळक मुद्दे पैनगंगा नदी आटली : इसापूर धरणाचे पाणी सोडणार कधी ?

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पैनगंगा नदीसह संपूर्ण तालुक्यात इसापूर धरणाच्या कालव्याचे जाळे असतानाही तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तर अपुºया पावसाने हिवाळ्यातच पाणीटंचाई तीव्र झाली आहे. गावागावातील जलस्त्रोत तळाला गेले आहे. इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडावे, यासाठी नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. दरवर्षी कृती आराखड्याच्या माध्यमातून कोट्यवधींचा खर्च पाणीटंचाईवर होतो. मात्र त्याचा परिणाम वर्षभरही जाणवत नाही.उमरखेड तालुक्याच्या दक्षिण बाजूने पैनगंगा नदी वाहते. तर पुसद तालुक्यात असलेल्या इसापूर धरणाचा डावा कालवा तालुक्यातून जातो. या तालुक्यात सुपीक जमीन आहे. मात्र अथांग पात्र असलेली पैनगंगा गत काही वर्षांपासून कोरडी पडत आहे. पूर्वी पैनगंगा बाराही महिने खळखळ वाहात असायची. परंतु इसापूर धरण झाले तेव्हापासून पावसाळ्यात पुराचा तडाका आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई असे समीकरण झाले आहे. पैनगंगा नदी तीरावर तालुक्यातील ४० ते ५० गावे आहेत. या गावांना पाणीपुरवठा करणाºया नळयोजनांच्या विहिरी नदीतीरावर आहे. मात्र यंदा हिवाळ्यातच पैनगंगा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.माणसांसोबतच जनावरांही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उमरखेड तालुका शूगर बेल्ट म्हणून ओळखला जातो. शेकडो शेतकºयांचा ऊस यंदा कारखाना बंद असल्याने शेतातच उभा आहे. या उसाला पाणी देण्याची गरज आहे. मात्र नदीपात्र कोरडे आणि विहिरी तळाला अशा अवस्थेत शेकडो हेक्टरवरील ऊस वाळत आहे. इसापूर धरणाचे पाणी नगरपालिकेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्याची सुतराम शक्यता यंदा दिसत नाही. गत काही वर्षापासून बंदीभागातील नागरिक पैनगंगेच्या पाण्यासाठी दरवर्षी आंदोलन करतात. जिल्हाधिकाºयांना निवेदन देतात. त्यानंतर कुठे पाणी सोडले जाते. परंतु हे हक्काचे पाणीही मराठवाड्यातील गावे पळवून नेतात. त्यावरून मराठवाडा आणि विदर्भ असा संघर्ष निर्माण होतो.पाणीटंचाईवर दरवर्षी उपाययोजना केल्या जातात. मात्र या उपाययोजना तकलादू स्वरूपाच्या असतात. मे महिन्यापर्यंत कृती आराखड्यातील उपाययोजनांना प्रारंभच केला जात नाही. पावसाळ्याची प्रतीक्षा केली जाते. दरवर्षी निर्माण होणाºया या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरज आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षतालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र कोणताही लोकप्रतिनिधी या प्रश्नावर आवाज उठवायला तयार नाही. गावागावातील नागरिक लोकप्रतिनिधींना पाणीटंचाईची समस्या सांगत आहेत. मात्र आढावा बैठकांमध्ये तालुक्यातील लोकप्रतिनिधी काही बोलायला तयार नाही. यामुळे नागरिकांमध्ये आता रोष निर्माण होत आहे.

टॅग्स :Waterपाणी