शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचे संकट गडद

By admin | Updated: January 21, 2016 02:21 IST

यंदा झापलेला अपुरा पाऊस आणि आटलेल्या पैनगंगेमुळे उमरखेड तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे.

उमरखेड : यंदा झापलेला अपुरा पाऊस आणि आटलेल्या पैनगंगेमुळे उमरखेड तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. पैनगंगा नदीतीरावरील गावांमध्ये तर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ यंदा हिवाळ्यातच आली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडण्याची मागणी नदीतीरावरील नागरिक करीत आहे. परंतु अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही.उमरखेड तालुक्याची जीवनदायिनी पैनगंगा नदी यंदा हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे नदीतीरावरील सुमारे ४० गावांमध्ये पाणीसंकट निर्माण झाले आहे. या नदीतीरावर अनेक गावच्या नळयोजना आहे. नळयोजनेच्या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे विहिरीतच नाही तर टाकीत पाणी कोठून येणार, असा प्रश्न पडला आहे. तसेच भारनियमनही टाकीपर्यंत पाणी पोहोचण्यात अडथळा ठरत आहे. अशा स्थितीत नदी तीरावरील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नदीतीरावरील नागरिकांसारखीच स्थिती बंदी भागातीलही आहे. अनेक हातपंप नादुरुस्त आहेत. तसेच विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.उमरखेड पंचायत समितीने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यात विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे. मात्र आतापर्यंतचा अनुभव पाहता या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी नागरिकांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हा निधी नेमका कशावर खर्च होतो, हाही संशोधनाचा विषय आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून प्रशासन एकीकडे गावात जलस्त्रोत वाढल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे तीच गावे पाणीटंचाईच्या कृती आराखड्यातही दिसत आहे. यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ येणारा निधी कसा खर्च होतो, हे दिसून येते.उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडले तर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईवर मात होवू शकते. परंतु प्रशासन अद्यापही इसापूर धरणाचे पाणी सोडायला तयार नाही. त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात दिसत आहे. उमरखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शहरातील काही भागातही पाणीटंचाई जाणवत आहे. जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून मार्च, एप्रिल महिन्यात काय होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे पाणीटंचाई निवारण्यासाठी लोकप्रतिनिधी कोणताही पुढाकार घेताना दिसत नाही. नागरिक आंदोलनाच्या तयारीत असले तरी लोकप्रतिनिधी मात्र त्यावर बोलायला तयार नाही. दरवर्षी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. खास करून नदीतीरावरील नागरिक पाणीटंचाईने हैराण असतात. परंतु त्यांच्यासाठी कायमस्वरूपी योजना केली जात नाही. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा आणि उन्हाळ्यातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)