वॉटर कप स्पर्धा लोकचळवळ व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 21:57 IST2018-04-02T21:57:44+5:302018-04-02T21:57:44+5:30
सध्या जिल्ह्यात पाणी समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे यावर्षी राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी येथे आयोजित आढावा सभेत केले.

वॉटर कप स्पर्धा लोकचळवळ व्हावी
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : सध्या जिल्ह्यात पाणी समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे यावर्षी राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी येथे आयोजित आढावा सभेत केले.
येथील वसंत जिनिंग सभागृहात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. डॉ.राजेश देशमुख म्हणाले, हमखास ९०० मिमी पाऊस पडणाºया आपल्या जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली. भविष्यातील मोठ्या संकटाची ही चाहूल आहे. यामुळे आपण वेळीच सावध होवून जलयुक्त शिवार शेततळे, शोषखड्डे, विहीर पुनर्भरण आदींच्या माध्यमातून आणि वॉटर कप स्पर्धेच्या साहाय्याने गाव पाणीदार करावे, असे आवाहन डॉ.देशमुख यांनी केले.
या बैठकीला पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ.अविनाश पौळ, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, उषा भोयर आदी उपस्थित होते. डॉ.अविनाश पौळ यांनी वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करणे खूप खडतर असल्याचे सांगितले. मात्र स्पर्धेत सहभागी गावातील नागरिकांनी कुणाचीही वाट न बघता श्रमदान करण्याचे आवाहन केले. यावेळी गेल्यावर्षी वॉटर कप स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणाºया कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. काही नागरिकांनी गावातील समस्या कथन केल्या. डॉ.पौळ यांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. संचालन संतोष शिरसाट तर आभार संगीता वासाडे यांनी मानले. बैठकीला स्पर्धेतील गावांचे प्रतिनिधी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक उपस्थित होते.