दहागाव जलशुद्धी केंद्रात पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:07 IST2017-09-09T22:06:42+5:302017-09-09T22:07:21+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाºया दहागाव जलशुद्धीकरण केंद्राची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या दुलक्षितपणामुळे हे पाणी वाया जात आहे.

Wastewater dissipation in Tangaon Water Harvesting Center | दहागाव जलशुद्धी केंद्रात पाण्याचा अपव्यय

दहागाव जलशुद्धी केंद्रात पाण्याचा अपव्यय

ठळक मुद्देजलवाहिनी फुटली : प्रशासनाचा दुर्लक्षितपणा ठरला कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शहराला पाणीपुरवठा करणाºया दहागाव जलशुद्धीकरण केंद्राची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या दुलक्षितपणामुळे हे पाणी वाया जात आहे.
पुसद रस्त्यालगत असलेली जलवाहिनी फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. दहागाव येथील जलशुद्घी केंद्रातून उमरखेड शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ही जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र नगरपरिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे ही जलवाहिनी फुटल्याने शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यावर्षी अपुºया पावसामुळे आधीच पाण्याचे दुर्भिष जाणवण्याची चिन्हे दिसत आहे. संपूर्ण तालुक्यावरच पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे.
इसापूर धरणात अत्यल्प जलसाठा आहे. पैनगंगा नदीपात्रात या धरणातून पाणी सोडले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत पाण्याचा जपून वापर होणे गरजेचे आहे. उमरखेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणाकडून गेल्या दोन वर्षांपासून जलकुंभाचे काम सुरू आहे. मोठ्या जलवाहिनीचे काम गतिमान होत आहे. दहागाव जलशुद्धीकरण केंद्रात पैनगंगेच्या पात्रातून पाणी येते. मात्र, जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे. दररोज शेकडो लिटर वाया जाणाºया पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Web Title: Wastewater dissipation in Tangaon Water Harvesting Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.