लाखो खर्ची घालूनही कचरा व्यवस्थापन कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:34 IST2021-07-25T04:34:49+5:302021-07-25T04:34:49+5:30
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न घेऊन जनआंदोलन उभारणार आंदोलन फोटो ज्ञानेश्वर ठाकरे महागाव : नगरपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मागील सहा महिन्यांपूर्वीच संपला. ...

लाखो खर्ची घालूनही कचरा व्यवस्थापन कोलमडले
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न घेऊन जनआंदोलन उभारणार आंदोलन
फोटो
ज्ञानेश्वर ठाकरे
महागाव : नगरपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मागील सहा महिन्यांपूर्वीच संपला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असून शहरातील कचरा कोंडीच्या समस्यांवर कोणीही बोलायला तयार नाही. लाखो रुपये खर्ची घालूनही कचरा व्यवस्थापन कोलमडले आहे.
कचरा व्यवस्थापन करणारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे. बड्या नेत्यांच्या मर्जीतील कंत्राटदारास घनकचरा व्यवस्थापन कंत्राट देण्यात आला. संबंधित कंत्राटदार घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी असमर्थ ठरला. परिणामी शहरातील विविध प्रभागांत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
मागील अनेक दिवसांपासून घंटागाड्या बंद पडल्या आहेत. नावापुरताच कचरा गोळा केला जात आहे. मजुरांना सात दिवस काम देण्यास कंत्राटदार टाळाटाळ करीत आहेत. या मजुरांसाठी कुणीही पुढे येण्यास तयार नाही. त्यामुळे कचऱ्याचे राजकारण दिवसेंदिवस वाढत आहे.
बॉक्स
कचरा कोंडीतून शहराला सोडवा
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या यंत्रणेविरुद्ध जनआंदोलन आधार संघर्ष समितीने आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. कचरा कोंडीचे त्वरित व्यवस्थापन करा, अन्यथा गांधीगिरी करून जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात हस्तक्षेप करावयास भाग पाडू, असा इशारा जनआंदोलन समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी दिला आहे.
240721\img_20210724_123927.jpg
कचऱ्याचे ढीग साचलेल्या ठिकाणी शहरातील मोकाट जनावरे कचऱ्यातील पंन्या खातांना