पानठेले, चहा कँटीन उघडण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 05:00 IST2020-08-06T05:00:00+5:302020-08-06T05:00:16+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. पानठेला, चहा कँटीन, ऑटोरिक्षा चालक, झुनका भाकर केंद्र चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उपाशी राहून मरण्यापेक्षा परिस्थितीशी लढाई करून व्यवसाय सुरू करण्याची तयारी या व्यावसायिकांनी दर्शविली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्त्व या व्यावसायिकांना लाभणार आहे.

पानठेले, चहा कँटीन उघडण्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अधिकृत परवानगी देत नसाल तर नाईलाजाने व्यवसाय सुरू केला जाईल, असा इशारा पानठेला, चहा कँटीन, हॉटेल व्यावसायिक आदींनी दिला आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी यवतमाळ शहर पानशॉप असोसिएशनने निवेदन सादर केले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. पानठेला, चहा कँटीन, ऑटोरिक्षा चालक, झुनका भाकर केंद्र चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उपाशी राहून मरण्यापेक्षा परिस्थितीशी लढाई करून व्यवसाय सुरू करण्याची तयारी या व्यावसायिकांनी दर्शविली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्त्व या व्यावसायिकांना लाभणार आहे.
दुकानाचे भाडे, बँकेचे हप्ते, बचत गटाचे कर्ज, वीज बिल थकीत झाले आहे. याशिवाय अनेक प्रश्न निर्माण झाल्याने कुटुंब त्रस्त आहे. आज व्यवसाय सुरू करण्याची गरज असून परवानगी मिळावी, असे निवेदन असोसिएशनतर्फे देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेश राठोड, पान असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मिरासे, उपाध्यक्ष राहुल ढळे, सचिव सूर्यकांत सावदे, सहसचिव प्रथमेश कपुले, कोषाध्यक्ष पप्पू चौकडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय गायकवाड, शैलेश भानवे, लक्ष्मीकांत लोळगे, लक्ष्मण पाटील, राजाभाऊ तलवारे, प्रसेनजित भवरे, शिवदास कांबळे, विवेक वाघमारे, विनोद बिसेन, सुरेश बिसेन, रोशन गजभिये, दुर्गेश कवाडे, राजेश यादव, राजू सचदिवे आदींनी निवेदन दिले.