शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

लाखोंना जगविणारी वर्धा नदी मरणाच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 10:12 PM

सहा जिल्हे आणि जवळपास २५ तालुक्यांतील लाखो लोकांसाठी जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचेच अस्तित्व संकटात सापडले आहे. पूर्वी बारमाही वाहणारी वर्धा नदी आता एक-दोन महिने सोडले तर कोरडीठक्क असते. पावसाळा संपताच तिचे पात्र संकुचत होते. अनेक ठिकाणी तर ती नाल्यासारखी होऊन जाते. काही ठिकाणी या नदीचे रुपांतर चक्क डबक्यात होऊन जाते.

ठळक मुद्देपूर्वी बारमाही.. आता कधीच नाही : ३०० तालुक्यांतील जनजीवनावर परिणाम, पुनरुज्जीवनाची गरज

के.एस.वर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : सहा जिल्हे आणि जवळपास २५ तालुक्यांतील लाखो लोकांसाठी जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचेच अस्तित्व संकटात सापडले आहे. पूर्वी बारमाही वाहणारी वर्धा नदी आता एक-दोन महिने सोडले तर कोरडीठक्क असते. पावसाळा संपताच तिचे पात्र संकुचत होते. अनेक ठिकाणी तर ती नाल्यासारखी होऊन जाते. काही ठिकाणी या नदीचे रुपांतर चक्क डबक्यात होऊन जाते. वर्धा नदीचा असाच ऱ्हास होत राहिला तर काही वर्षात तिचे केवळ नावच शिल्लक राहण्याचा धोका आहे.एकेकाळी हिरवागार राहणारा वर्धा नदीकाठावरील परिसर आता ओसाड होत चालला आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या शेतीचे सिंचन, ग्रामीण-शहरी भागातील नळयोजना, जनावरांसाठी उपलब्ध पाणी आणि चारा, मासे उत्पादन, टरबुज, डांगर, शिंगाडे आदींची शेती, नदीमुळे आसपासच्या गावात टिकून असलेली भूजल पातळी, उद्योग व्यवसाय आदी गोष्टींवर आताच परिणाम होऊ लागला आहे.देशात नदीजोड प्रकल्पाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काही ठिकाणी त्यावर कामेही सुरू झाली आहे. गंगा स्वच्छता अभियानावरही कोट्यवधी रुपये खर्च केल्या जात आहे. नमामी गंगे, नर्मदा परिक्रमा आदी कार्यक्रमांद्वारे या नद्यांचे महत्व समजून ते टिकविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. राजस्थानमधील जलदूत राजेंद्र सिंग यांनी लोकचळवळ उभारून दुष्काळाच्या छायेत मृतप्राय झालेल्या विविध नद्या बारामाही वाहत्या केल्या आहे. वर्धा नदी कोरडी पडल्याने परिसरातील नळयोजना, विहिरी, हातपंप कोरडे पडले. त्यामुळे नागरिकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना टँकर वा तत्सम साधनाद्वारे पाणी उपलब्ध करून देणे, विविध उपाययोजना करण्यात पर्यायाने जनतेचा पैसा खर्च होत आहे.वर्धा नदी बारामाही वाहती राहावी याकरिता शासनस्तरावर कृती आराखडा बनवून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. तोपर्यंत नदीपात्राच्या परिसरातील गावे, शहरे, तालुके, जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या परीने लोकचळवळ उभारून वर्धा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. नदीपात्रात उभी नांगरणी करणे, नदीपात्र खोल व रूंद करणे, पात्राच्या कडेचे क्षेत्र स्वच्छ, साफ करून मोकळे करणे आवश्यक आहे. याकरिता अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील धुरिणांनी आपआपला सहयोग मे-जून महिन्यात देणे आवश्यक झाले आहे.असा आहे वर्धा नदीचा उदयास्तवर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई तालुक्यातून झाला आहे. बैतुल जिल्ह्यानंतर अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून ती वाहते. ३०० किलोमीटरपेक्षा अधिक लांब वाहणारी ही विदर्भातील महत्त्वपूर्ण नदी गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वैनगंगा नदीत विलीन होते.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदी